मी असा काय केला गुन्हा तू सांग ना..?
▪️सुशिक्षित ,बेरोजगार ,राजकारणाचा बळी ठरलेल्या रवी जाधव यांची सावंतवाडी वासियांना आर्त हाक
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 संपादकीय :सिताराम गावडे*
*🎴सावंतवाडी :* येथील जिमखाना मैदान परिसरात राहणारा अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून स्वतःच्या कर्तुत्वावर धडपड करून मिळेल त्याची मदत घेऊन ,आपले उच्च शिक्षण बी ए ,एम ए,एम फील, पूर्ण करून नोकरी मिळत नाही म्हणून रस्त्यावर कटलरी वस्तू विकणाऱ्या एका उमद्या ,धडपडी, व्यापाऱ्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मन सुन्न होते..शब्द देखील अबोल होतात.ज्या सावंतवाडी संस्थांनाला महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हटलं ज्या बापूसाहेब महाराज यांना रामाची उपमा दिली गेली ते लोकराजा बापूसाहेब महाराज यांच्या मृत्यूच्या वेळी मोळ्या घेऊन बाजारात विकायला आलेली ग्रामीण भागातील महिला अक्षरश मोळ्या टाकून रडत घरी गेली, एवढे प्रेम जनतेचे राजावर होते. अशा राजाने सावंतवाडीचे नेतृत्व केले या संस्थांचे नेतृत्व केले त्यांच्या या संस्थांना मध्ये अशा बारीकसारीक गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीला दलित, पीडित, शोषित, गरीब ,राजकारणाचा बळी करुन चिरडण्याचा प्रयत्न होत असेल तर तो या पाटेकरच्या भूमीत निश्चितच भूषणावह नाही.
उच्चशिक्षित युवक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर बसून गृहपयोगी सामान विकतो याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा, तो सोडून सूडबुद्धीने रवी जाधव यांच्यावर कारवाई होत असेल तर ती निश्चितच निषेधार्ह आहे, रवी जाधव यांचे काही चुकलेही असेल मात्र मोठ्या मनाने माफ करण्याची तेवढी धमक लागते, राजकारण करत असताना आपण कोणाच्या पोटाला देऊ शकलो नाही तर त्याच्या पोटावर मारू नये,रवी जाधव यांनी तात्पुरत्या स्वरुपात असलेला आपला स्टॉल कायमस्वरूपी द्या अशी मागणी कधीच केली नव्हती मात्र त्याच्या मागणीला वेगळा रंग लावून ,वेगळे रूप देऊन, रवी जाधव यांची अहवेलना करण्यात आली निमित्त ठरले ते सर्व पक्षांनी केलेले आंदोलन आणि बळीचा बकरा ठरला तो रवी जाधव.
मरताना माणूस आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, तो धडपड करतो, कसा यातून मी जगेन ,कसा बाहेर पडेन, तेच रवी जाधव यांनी केले आपल्यावर होणारा अन्याय सर्वांना समजावा आपले काय चुकले हे कोणी तरी सांगावे यासाठी त्याने अनेक राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले सगळ्यांनी त्याला मदत केली ,धीर दिला,पण याच राजकारणाचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी जागा देणार नाही अशी दर्पोक्ती केली.
बापू साहेबांच्या या संस्थांमध्ये अशा बारीकसारीक गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीला दलित ,पीडित ,शोषित ,गरीब, व्यक्तीला चिरडण्याचा प्रयत्न होत असेल तर तो या पाटेकरच्या भूमीत निश्चितच न्याय नीतीला धरून नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
कोणतेही काम करण्याची धमक असलेला रवी कोणासमोरही नतमस्तक होणारा रवी ,अगदी लहान मुलाला देखील साहेब म्हणून हाक मारणारा रवी ,एवढा उन्मत्त होऊन सत्ताधाऱ्यांना मी तुमचे कसे काय ते बघतो असे सांगेल असे मला कधीच वाटत नाही, कारण मी आज नाही तर गेली दहा वर्षे रवी याला ओळखतो शुत्रुलाही प्रेमाने जिंकणाऱ्या रवि ला कोण शत्रूच असू शकत नाही.
त्याने आपल्या हुशारीने ,कर्तबगारीने, जिमखाना परिसरातील अनेक दलित बांधवांना शासकीय योजनेतून घरे मिळवून दिली, प्रारंभी झोपडपट्टीत राहणारा रवी स्वकर्तृत्वावर चांगल्या घरात गेला, त्यामागे त्यांचे अपार कष्ट, मेहनत जिद्द, आहेच . अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक दोन नंबर धंद्या कडे वळले आहेत, दारू, गुटखा ,गांजा ,यांच्या व्यसनाच्या आधीन होऊन झटपट श्रीमंत होण्याचा नादात आपले आयुष्य बरबाद करीत आहेत ,अशा परिस्थितीत रवी जाधव सारखा एक धडपडी युवक, बेरोजगार, आपल्या कुटुंबातील सर्व भावांना रोजगार निर्माण करून देतो, त्यांना चांगल्या मार्गावर आणतो ,तुम्ही जगा व इतरांना जगवा ही सद्गुरू वामनराव पै यांची वचने सत्यात उतरवतो अशा युवकांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा खरोखरच मन दुःखी होते.
लोक म्हणतात सावंतवाडी वासियांना सावंतवाडीत काय चालले त्याच्याशी देणेघेणे नाही हे मात्र धांदात खोटे आहे,सावंतवाडीवासिय हुशार चाणाक्ष,कुठे थांबायचे,कुठे नडायचे, हे ज्ञात असलेले आहेत.
काही जणांना वाटत असेल की मी सावंतवाडी वासियांना कसे उल्लू बनवतो मात्र सावंतवाडी वासिय हे बापूसाहेब महाराजांच्या संस्थानात जन्म घेऊन मोठे झालेले नागरिक आहेत, त्यामुळे या सर्व गोष्टींची जाण त्यांना आहे, म्हणून सावंतवाडीवासियांना कोणी उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नये असा प्रयत्न झालाच तर त्याची गत माकडांच्या टोपी सारखे होईल हे ध्यानी ठेवावे.
रवी जाधव यांच्या उपोषणा वरून व त्याला सावंतवाडीत जागा देण्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे, जे बेकायदेशीर आहेत त्यांना तुमचे स्टॉल रवी जाधव यांच्या उपोषणामुळे काढावे लागतात याला सत्ताधारी जबाबदार आहेत असे सांगून आंदोलन कुठेतरी पेटवण्याचा प्रयत्न होत आहे ,माझे एवढेच मत आहे आपण कोणाच्या पोटाला घालू शकत नाही तर त्याचा घास हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, तो युवक प्रामाणिकपणे शहरात आपले प्रपंच, पोट चालण्यासाठी धंदा करतो, तो कुठे चोरीमारी लबाडी करत नाही तर त्याचा धंदा हिरावून घेण्याचा अधिकार या पाटेकर च्या भूमीत कोणालाही नाही
संस्थानचा ३६५ खेड्यांचा शाळा श्री देव उपरलकर आपल्या रयतेच्या रक्षणासाठी हातात दांडा घेऊन उभा आहे कोण काही जाणूनबुजून चुकीचे करत असेल तर त्याचा दांडा १०० टक्के बसणारच , कारण भगवंताच्या काठी ला आवाज नाही त्याचा मार मात्र निश्चित बसणार,याचा विचार संबंधितांनी करावा.
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांचे गाव जरी मडुरा असले तरी त्यांचा जन्म हा सावंतवाडीत झाला आहे, कारण ते शालेय जीवनापासूनच माझे वर्गमित्र त्यांचा मूळचा स्वभाव संयमी आहे एकदा ठरवले किती करायचे मात्र एखादी गोष्ट पटली की ती अंमलात आणायची हा त्यांचा मूळ स्वभाव राजकारणातील संजू सध्या बदललेल्या अवस्थेत मला दिसत आहे.संजू ने हलक्या कानाचा न होतो विघ्नहर्त्या श्री गजानन सारखे विशाल कानाचा व्हायला शिकायला हवे , स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या कानांनी जे आपण ऐकतो त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे आपल्या स्वार्थासाठी कोणी काही तरी येऊन कान भरून आपला हेतू साध्य करत असेल तर त्याची वेळीच जाणीव नगराध्यक्ष संजू परब यांना व्हायला हवी असे मला वाटते. कारण संजू परब यांना दूरवरचे राजकारण करायचे असेल तर संकुचित मनोवृत्ती ही सोडली पाहिजे ,मोठ्या मनाने सावंतवाडी रवी जाधव यांचे तात्पुरते स्वरूपाचे पुनर्वसन त्याच जागेत करून आपणही संस्थांच्या रामराज्यात निरपेक्ष नगराध्यक्ष म्हणून काम करतो दाखवून द्यायला हवे. बरेच काही आहे तूर्तास एवढेच…
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_