सावंतवाडीतील पत्रकार कक्षाला “बाळशास्त्री जांभेकर” यांचे नाव देणार..
▪️संजू परब; जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकारांची जयंती साजरी…
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी :* नगरपालिकेतील पत्रकार कक्ष अद्ययावत व सुसज्ज करून त्याला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नामकरण केले जाईल,तसेच पालिकेच्या लोकमान्य सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या तस्वीरी सोबतच बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा लावण्यात येईल,अशी ग्वाही नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.शासनाच्यावतीने सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची २०९ वी जयंती जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघ यांच्याकडून पालिकेच्या लोकमान्य सभागृहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी श्री.परब बोलत होते.
यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,मुख्याधिकारी जयंत जावडेकर,पालिकेेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर,जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत,सदस्य हरीश्चद्र पवार,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,तालुका पत्रकार संघाचे सचिव अमोल टेंबकर,जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,नरेंद्र देशपांडे,अनिल भिसे,शुभम धुरी आदी उपस्थित होते.
श्री.परब पुढे म्हणाले, सिंधूपुत्र दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्र क्षेत्राला जन्म दिला.ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.त्यांची प्रतिमा नगरपालिकेत लावल्यानंतर याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला त्यांची प्रेरणा घेता येईल,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना श्री.नाईक म्हणाले,थोर पुरुषांसोबतच बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सुद्धा शासनाने दरवर्षी साजरी करावी,यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता.त्याला यश आले आहे.शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याला आदर्शवत ठरणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक पूर्णत्वास येत आहे.त्याठिकाणी पत्रकारितेशी संबंधित सर्व अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.विशेषतः पत्रकारितेचे शिक्षण त्या ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री.जावडेकर म्हणाले, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ब्रिटिशांच्या विरोधात निद्रिस्त लोकांना जागृत करण्यासाठी “दर्पण” हे पहिले वृत्तपत्र प्रसिद्ध केले. ते सिंधुदुर्ग चे सुपुत्र आहेत याचा जिल्हावासियांना अभिमान वाटला पाहिजे. त्यांच्या स्मारकाचे स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी नवोदित पत्रकारांना घडविणारे पत्रकारितेचे शिक्षण सुरू करण्यात यावे,तसे झाल्यास बाळशास्त्रींना ती खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_