काजु दर निश्चित करण्यासाठी शेतकरी, बागायतदार, व्यापारी ,यांची बैठक लावावी
*▪️ काजु दर निश्चित करण्यासाठी शेतकरी, बागायतदार, व्यापारी ,यांची बैठक लावावी*
*▪️शेतकरी फळबागयतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांची माघणी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*
*🎴 सावंतवाडी*
भात शेतीला पर्याय म्हणून काजू शेतीवर भर देणारे शेतकरी गेल्या दोन वर्षापासून काजूला दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा देखील काजू १३० रुपये प्रति किलो दर बांदा बाजारपेठेत लावण्यात आला असून शेतकऱ्याला किमान १५० रुपये प्रति किलो दर मिळावा अशी बागायतदारांची मागणी आहे.
दरम्यान काजू दर निश्चित करण्यासाठी शेतकरी,कारखानदार व व्यापाऱ्यांची बैठक लावावी अशी शेतकरी व फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
भात शेतीला काजू पीक पर्याय ठरेल. काजूला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी भात शेती सोबतच काजू बागायतीवर प्राधान्य दिले मात्र गेल्या दोन वर्षात मध्ये काजू बीला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा बँकेने प्रयत्न करून देखील शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही दोन वर्षापूर्वी काजू बी ला १७० रुपये प्रति किलो भाव मिळाला होता तो भाव खाली येत तो मागील वर्षी १२० पर्यंत खाली कोसळत अखेर ९० रुपये किलोपर्यंत तो येऊन ठेपला होता.
यंदा काजू बी ला भाव चांगला मिळावा अशी मागणी बागायतदारांची आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूला प्रति किलो दर हा बांदा बाजारपेठेच्या दरावर अवलंबून असतो बांदा बाजारपेठेमध्ये काजू प्रतिकिलो दर निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठेत त्या दराबाबत निश्चिती होते. यंदा बांदा मध्ये १३० रुपये प्रति किलो दर सुरू झाला असून तो १५० रुपयांपर्यंत मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
यादरम्यान शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, सचिव सौरभ सिद्धये यांच्या नेतृत्वाखालील काजू बागायतदार जगदेव गवस, नितीन सावंत, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, रोणापाल सरपंच सुरेश गावडे आदींनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना एक निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवत आहेत. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वाढती मजुरी, पडलेल्या अथवा पाढवलेला दर या सर्वांशी संघर्ष करीत स्वाभिमानाने शेतकरी उभा आहे. मात्र नैसर्गिक गोष्टींशी सामना करताना तो थकून जात असल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे.
या संदर्भात दापोली कृषी विद्यापीठाने काजू उत्पादन खर्च किलो मागे १२२.५० रूपये जाहीर केला तर शेतकरी व फळबागायतदार संघाने १२८ रुपये प्रति किलो काजू भाव जाहीर केला आहे यातील पाच ते साडेपाच रुपये तफावत ही शासकीय रोजंदारी व स्थानिक रोजंदारी यांमधील आहे. तसेच यावर २० ते २५ रुपये प्रति किलो नफा मिळायला हवा अशी काजू बागायतदारांची रास्त मागणी आहे. म्हणजेच काजूला किमान १४० ते १५० रुपये प्रति किलो भाव मिळायला हवा असे बागायतदारांचे म्हणणे असून या भूमिकेशी महाराष्ट्र केशव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सहमत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
काजू व्यापारी संघटना मार्केटमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू खरेदी करतात पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्याबाहेरील, राज्याबाहेरील अनेक कारखानदार शेतकरी व फळबागायतदार संघाशी संपर्कात असून योग्य दराने काजू खरेदी करण्यास इच्छुक आहे परंतु स्थानिक काजू कारखानदारांना ही योग्य दराने काजू घेत असल्यामुळे काजू बागायतदार शेतकरी कारखानदार व्यापारी संघटनांची बैठक घेऊन प्रांताधिकारी यांनी यामध्ये समन्वय घडवून बागायतदारांना आर्थिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येपासून रोखले जातील असे या निवेदनात म्हटले आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_