नैसर्गिक शेती क्रांती काळाची गरज..जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी :सुनिल आचरेकर
🎴कसाल : कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवास जिल्ह्याचे जिल्हाधिकरी के.मंजुलक्ष्मी ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.संजय भावे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली, शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टी बजरंग चव्हाण, सिंधुदुर्ग एनसीसी युनिटचे प्रमुख कर्नल नरेश उपस्थित होते. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सर्वांनी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाचे व नैसर्गिक शेती प्रदर्शनाची पाहणी केली व त्यानंतर फळ प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन जिल्हाधिकारी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या ब्रिगेडीअर सुधीर सावंत हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चॅम्पियन आहेत. २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करत असून नैसर्गिक शेती क्रांती निर्माण करत आहेत त्याबद्दल ब्रिगेडीअर यांचे अभिनंदन केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत शेतकर्यांसाठी खूप चांगले काम करत असून संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या उपक्रमांना मदत करून पाठीशी राहिले असे त्या म्हणाल्या. शेती ही संस्कृती आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक नफा व्हायला पाहिजे. त्यावेळीच लोक शेती करू लागतील. आपला जिल्हा स्वच्छ व सुंदर आहे. प्रत्येकाने आपल्या सदृढ आरोग्यासाठी आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. नवीन पिढीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ब्रिगेडीअर सुधीर सावंत राबवित असलेला समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प नावीन्य पूर्ण असून त्यासाठी प्रशासनाद्वारे संपूर्ण मदत करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. संपूर्ण जिल्ह्याच्या समृद्धी साठी आपण कटिबद्ध राहू असे त्या म्हणाल्या.
समृद्धी आणि आनंदी गावचे जनक ब्रिगे.सुधीर सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की देशाला संरक्षण व अन्न पुरविणारी जमात म्हणजे शेतकरी. गेल्या २५ वर्षात शेतकर्यांसाठी विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्तर उंचवण्यात कृषी प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे. यापुढे जाऊन जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारत भर नैसर्गिक शेती क्रांतीची चळवळ उभी करण्याचा मानस केला आहे. नैसर्गिक शेती ही आरोग्यदायी जीवनासाठी उपयुक्त असून ती केल्याने शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. कृषिवर आधारित उद्योग या जगात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आज स्फूर्ती फळ प्रक्रिया केंद्राचा पायाभरणी कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला. त्यासाठी संजय किर्लोसकर, मयुर वोरा यांसारख्या उद्योजकांना मी घेऊन आलो असे ते म्हणाले. प्रत्येकाने सकस अन्नाचे सेवन केल्यास माणूस आजारी पडणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासाठी पुढील २५ वर्षाचा प्रवास हा जिल्हा आजार मुक्त करण्यावर असणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले समृद्ध आणि आनंदी गाव चा ब्रिगे. सुधीर सावंत यांनी मांडलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या नैसर्गिक शेती व समृद्ध व आनंदी गाव मोहिमेमध्ये जिल्हा परिषद यंत्रणा सर्वतोपारी सहकार्य करील असे ते म्हणाले. आपल्या गावच्या विकासासाठी ग्रामस्थानी सुद्धा तितक्याच बाबतीत सहभाग घेणे अपेक्षित आहे.माजी वसुंधरा या योजनेच्या माध्यमातून कृषी प्रतिष्ठान सोबत जिल्हा परिषद काम करेल असे ते म्हणाले.
कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाचा उपयोग शून्य आहे. कृषी विज्ञान केंद्राचे काम अतिशय चांगले असून कुक्कुटपालन गल्लीतधान्य लागवड, कडधान्य लागवड, मार्केटिंग नैसर्गिक शेती यासारखे उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकारणासाठी दर्जत्मक काम केले आहे. शेतीकडे उद्योगासारखे बघा, शेतकरी हा चिरंतर, समृद्ध व आनंदी झाला पाहिजे त्यासाठी ब्रिगे. सुधीर सावंत यांचा उपक्रम उत्कृष्ट आहे. माणसाचं आरोग्य जमिनी पासून सुरू होत त्यासाठी जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. यापुढे जय जवान जय किसान व जय विज्ञान या तंत्राने पुढे काम करावे लागेल.
शेतकरी हा पहिला शास्त्रज्ञ आहे त्याच्या पाठीमागे ठामपणे ब्रिगे.सुधीर सावंत यांची चळवळ उभी आहे त्यासाठी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. सतीश सावंत, बजरंग चव्हाण, राजन तेली यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिवाजी स्मारक मंडळ यांचे तर्फे बजरंग चव्हाण यांनी एक लाख रु. धनादेश कृषी प्रतिष्ठानाला मदत स्वरूपात सुपूर्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी केले. कार्यक्रमाला तरुण भारतचे कोकण विभागाचे समन्वयक पत्रकार शेखर सामंत उपस्थित होते. तसेच योगेश सावंत, उपाध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव दिनानाथ वेर्णेकर, प्राचार्य आशिष पाटील, आनंद सावंत, सैनिक फेडरेशन चे फ्लेचर पटेल, फ्रेंड्स ऑफ फार्मर्स चे अमर आपटे नीलम दळवी, राष्ट्रीय नैसर्गीक शेती गटाचे सजेस व दिया उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ व श्री. बाळकृष्ण गावडे, डॉ. विलास सावंत, श्री. विकास धामापूरकर , डॉ. केशव देसाई, श्री. विवेक सावंत भोसले,श्रीम. सुमेधा तावडे- खटावकर, तसेच कर्मचारी नरेंद्र सावंत, मंगेश पालव , कृषी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथळ प्रयत्न केले. सूत्र संचालन प्रा. स्नेह सामंत, मयूर सावंत यांनी केले. प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर यांनी मांडले तर आभार डॉ. शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांनी मांडले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संप
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_