कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

निधी नाकारणारी कुडाळ नगरपंचायत हि महाराष्ट्रातील एकमेव नगरपंचायत; संतोष शिरसाट

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१८: आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून कुडाळ शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे. परंतु कुडाळ नगरपंचायतचे राणे समर्थक नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक यांनी नगरपंचायत सभेत सदर विकास कामांना मंजुरी देण्यात येऊ नये असा ठराव पारित केला असून तो  ठराव आपल्या लेखी पत्राद्वारे  नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमदार वैभव नाईक यांना दिला  आहे. कुडाळ शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आ. वैभव नाईक निधी देत असलेल्या प्रत्येक कामाला  नगराध्यक्ष व  सत्ताधारी नगरसेवक विरोध करत आहेत. विकास कामासाठी आलेला निधी नाकारणारी  कुडाळ नगरपंचायत हि  महाराष्ट्रातील एकमेव नगरपंचायत आहे. असा पोलखोल शिवसेना कुडाळ  शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी केला आहे.

संतोष शिरसाट पुढे म्हणाले, कुडाळच्या जनतेने प्रत्येक निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना भरभरून प्रेम दिले आहे. जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासास ते पात्र ठरले असून कुडाळ येथे मच्छिन्द्र  कांबळी नाट्यगृह, अद्यावत कुडाळ बसस्थानक, सुसज्ज क्रीडांगण, भंगसाळ नदी बंधारा, ऐतिहासिक घोडेबाव विहीर सुशोभीकरण, सुलभ शौचालय अशी शहरातील महत्वाची कामे आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.कुडाळच्या नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण निर्माण करण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी कुडाळ भंगसाळ नदीवर गार्डनसाठी ५ कोटी  रु. मंजूर केले आहेत मात्र कुडाळ नगरपंचायतचे सत्ताधारी यांच्या नाकर्तेपणामुळे हे काम रखडले आहे.

तसाच प्रकार आता  आमदार स्थानिक विकास निधी बाबत होत आहे. आमदार वैभव नाईक यांनी वैभव सावंत घर ते अँड. श्री. कुंटे  यांच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे व कुडाळ वरची कुंभारवाडी ओंकार कार्यालय नजीक सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे  या मंजूर केलेल्या कामांविरोधातील  ठराव कुडाळ नगरपंचायतचे राणे समर्थक नगराध्यक्ष व  सत्ताधारी नगरसेवक यांनी घेतला आहे. विकास कामांमध्ये खो घालण्यासाठीच शहरविकासाठीचा शासनाचा निधी नाकारुन  नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून राजकारण केले जात आहे. कुडाळच्या नागरिकांनी याचा जरूर विचार करावा असे संतोष शिरसाट म्हणाले आहेत.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!