महावितरणकडून थकीत वीजदेयकांपोटी जनतेची वीज खंडित करण्याची कारवाई केली जात असताना जिल्ह्यातील आमदार,खासदार  मजा बघत आहेत का..?

▪️कुठे गेले ते वीज बिल माफी देण्याचे आश्वासन देणारे..? “भीक नको पण कुत्रं आवर” सरकार विरोधात जनतेच्या भावना तीव्र..

▪️वीज बिल वसुलीपोटी ग्रामपंचायतींना ३० टक्के कमिशन देण्याचे जाहीर करणारे राज्य सरकार प्रत्यक्षात जनतेला ३० टक्के वीज बिलात सूट का देत नाही; मनसेचा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१८: राज्यातील शिवसेना,कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघाडी सरकारने वीज बिलांसंदर्भात जनतेची सपशेल फसवणूक केली असून आता मात्र महावितरण कडून वीज खंडित करण्याची कारवाई केली जात असताना जनतेची मजा बघत आहेत.एकीकडे कोरोना कालावधीत राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना कंपन्यांकडून वीज देयके देण्यात आली नाहीत अशी माहिती पुढे आली होती तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेकडून मात्र जबरदस्तीने वीज बिल वसुली केली जात असल्याने हे ‘ठाकरे सरकार हे  लूटेरं सरकार’ असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. वीज बिलात सूट तर नाहीच पण ग्रामपंचायतींना वीज वसुली करून दिल्यास ३० टक्के कमिशन देण्याचा प्रस्ताव पुढे करून राज्य सरकार जनतेची जणू चेष्टाच करत आहे. ३० टक्के कमिशन द्यायला परवडत मग वीज बिलात सूट द्यायला नेमकी कोणती अडचण आहे हे सरकारच्या प्रतिनिधींनी जाहीर करावं अशी मनसेची मागणी आहे. वाढलेली महागाई व त्यात पेट्रोल डिझेल दरवाढ ही क्लेशदायक आहेच मात्र इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरून आक्रोश करणारी शिवसेना जबरदस्तीच्या वीज वसुली व कारवाई विरोधात मूक गिळून गप्प का हा खरा सवाल आहे.जनतेचा रोष पत्करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ३० टक्के कमिशनाच्या आमिषाला बळी पडून वीज बिल वसुलीची जबाबदारी स्वीकारू नये असे आवाहन जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत व्यवस्थापनांना मनसेच्यावतीने करण्यात येत असल्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!