🛑ओंकारने सरमळेतून थेट भालावल गाठले !
*🛑ओंकारने सरमळेतून थेट भालावल गाठले !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* बहुचर्चित ओंकार हत्तीने मंगळवारी ओटवणे गावाची सफर केल्यानंतर मध्यरात्रीनंतर तेरेखोल नदी ओलांडून सरमळे गाव गाठले. भरवस्तीत मध्यरात्री उशिरापर्यंत ठाण मांडलेल्या ओंकारने त्याचा मुक्काम हलविल्यामुळे ओटवणेवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ओंकारने बुधवारी सकाळी सरमळेतून विलवडे तिठामार्गे भालावल गाव गाठले. मात्र, मंगळवारी दुपारपासून बुधवारपर्यंत वन व पोलीस खात्याच्या फौजफाट्यासह बघ्यांच्या गर्दीत ओंकारच्या विविध करामतीसह त्याची आंघोळ लक्षवेधी ठरली.
अठरा वर्षांपूर्वी तीन हत्तींचा कळप ओटवणे गावात आला होता. त्यावेळी हत्तींच्या हल्ल्यात केशव उर्फ काका – परब यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे दीड तपापूर्वीच्या हत्तीच्या आठवणी पुन्हा या गावात जागृत झाल्या. त्यामुळे गावात ओंकारबाबत त्याच्या उत्सुकतेसह भीतीयुक्त वातावरण होते. मंगळवारी दुपारी वन खात्याच्या फौजेसह ओंकार प्रगट ओटवणे मांडवफातरवाडीत होताच अवघ्या काही मिनिटात शेकडो बघ्यांची गर्दी झाली. बघ्यांची ही गर्दी ओटवणेसह सरमळे, भालावल गावात कायम होती. दरम्यान, ओंकार भरवस्तीत अनेक घरांच्या अंगणापर्यंत जाऊन माघारी फिरला. या प्रवासात त्याने अनेक ठिकाणी विश्रांतीही घेतली. ओंकारने आपल्या या प्रवासासाठी या तिन्ही गावातील मुख्य रस्त्यासह बांदा दाणोली जिल्हा मार्ग व गावातून जाणाऱ्या तिलारी कालव्याचा मार्ग स्वीकारला. आपल्या या १५ तासांच्या प्रवासात ओंकारने मांडवफातरवाडी, कापईवाडी, गावठणवाडी, जाधववाडी, शेरवाळेवाडी असा प्रवास केला. शेरवाळेवाडी परिसरात मध्यरात्रीपर्यंत सुमारे पाच तास मुक्काम होता. मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास ओंकारने तेरेखोल नदीत पाऊल ठेवताच प्रथम यथेच्छ आंघोळ केली. त्यानंतर बुधवार सकाळपर्यंत सरमळे गावच्या हद्दीत नदीकिनारी तो पाच तास विसावला. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास लगतचा बांदा-दाणोली जिल्हामार्ग क्रॉस करून सरमळे कुंभारवाडीतून आमराईमार्गे पुन्हा जिल्हा मार्गावर येऊन विलवडे छत्रपती शिवाजी चौकातून भालावलच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी तब्बल पाऊण तास जिल्हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. ओंकारचा मुक्काम सध्या भालावल गावात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

