🛑 सिंधुदुर्गच्या राजकारणात ‘सुशिक्षित’ भूचाल
🛑 अभियंता संघटना रणांगणात उतरण्याच्या तयारीत ; पारंपरिक समीकरणांना आव्हान देण्याची चिन्हं
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-२८:- सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर नव्या वाऱ्याची चाहूल लागली आहे. जिल्ह्यातील “सिंधुदुर्ग सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना” यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्वतःचे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संघटनेच्या सूत्रांकडून समजते की, युवकांमधील वाढता असंतोष, बेरोजगारी आणि विकासातील राजकीय उदासीनता याला उत्तर देण्यासाठी आता ही संघटना थेट राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे.
संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, “देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख विचारसरणीचा अवलंब करून, समाजसेवेत रस असलेल्या सुशिक्षित युवकांना आणि अभियंत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली आहे.
संघटनेच्या मते, गावागावातील विकास प्रक्रियेत सुशिक्षित आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम व्यक्तींचा सहभाग वाढल्यास, कामांमध्ये गती, गुणवत्ता आणि पारदर्शकता आणता येईल.
“अभियंते आणि ठेकेदारच ग्रामविकासाचा गाडा वेगाने पुढे नेऊ शकतात,” असे प्रतिपादनही संघटनेकडून करण्यात आले आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान एक उमेदवार अशा पद्धतीने आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार संघटनेकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेतील चर्चांना वेग आला असून, जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हालचालींमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पारंपरिक राजकीय पक्षांत मात्र अस्वस्थता दिसून येत आहे.
*महत्त्वाचे प्रश्न आता उभे ठाकलेत…*
🔹 सिंधुदुर्गच्या राजकारणात “सुशिक्षित” लाट येणार का?
🔹 सत्ताधाऱ्यांच्या समीकरणात उलथापालथ होणार का?
🔹 की ही संघटना ठरणार नवा राजकीय पर्याय?
*सिंधुदुर्ग आता पाहणार “सुशिक्षित नेतृत्वा”चा नवा प्रयोग!”*
राजकारणात नव्या पर्वाची चाहूल – सर्वांचे लक्ष आता “सु.बे.अभियंता संघटनेच्या” पुढील पावलाकडे!
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

