🛑अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील “ती” संशयास्पद खरेदी निविदा रद्द.
*🛑अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील “ती” संशयास्पद खरेदी निविदा रद्द.*
*🛑भ्रष्ट कारभार करणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार?*
*🛑प्रसाद गावडेंचा अधिष्ठातांना सवाल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २८:-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्गमधील संशयास्पद निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला होता. यामध्ये कमी दराने निविदा भरलेल्या निविदाकाराला अपात्र ठरवून चढ्या दराने निविदा भरलेल्या मर्जीतील ठेकेदाराला खरेदीचा ठेका देण्याचा डाव सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उघडकीस आणला होता. अधिष्ठातांनी प्राथमिक चौकशीत सदरची निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे मान्य करत निविदा रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. परंतु या संशयास्पद व बेकायदा निविदा प्रक्रियेस जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही होत नसल्याने अधिष्ठातांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्रातून करत अधिष्ठातांकडे दोषी कर्मचाऱ्यांवार कारवाईची मागणी पत्राद्वारे केली आहे. निविदा प्रक्रियेबाबत संशयास्पद कारभार सिद्ध झाला असेल तर सदर संशयास्पद कारभाराला कोणकोणते कर्मचारी जबाबदार आहेत याची प्रशासकीयदृष्ट्या दोष निश्चिती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैद्यकीय संचनालयाकडून मेडिकल साहित्य खरेदी संदर्भात दिलेल्या पत्रात औषध निर्मात्याद्वारेच साहित्य खरेदी करण्याचे सूचना असताना देखील लिपिक संवर्गातील कर्मचारी खरेदी समितीला विश्वासात न घेता साहित्य खरेदीची निविदा काढतात यामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली असून दोषींवर प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे. खरेदीपूर्वी अधिष्ठातांची परवानगी घेतली होती का? अधिष्ठतांनी परवानगी दिली असेल तर औषधनिर्माता व खरेदी समितीला विश्वासात न घेता परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली? कार्यालयीन सुट्टीच्या कालावधीत निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यात आला तो नेमका कोणाच्या परवानगीने करण्यात आला? निविदा पूर्व बैठक का घेण्यात आलेली नाही? अल्प दरात निविदा भरलेल्या निविदाकाराला कशाच्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले? असे असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहत असून याची सखोल चौकशी होणे काळाची गरज आहे. प्राप्त माहितीनुसार अपात्र ठरविण्यात आलेल्या निविदा कार्याला विश्वासात घेऊन सदरची खरेदी यानंतर तुमच्या मार्फतच केली जाईल असे सेटलमेंट करून तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची जोरदार चर्चा मेडिकल कॉलेजमध्ये ऐकिवात आहे. या संदर्भात अधिष्ठातांकडून दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनतेच्या पैशांचा होणारा अपहार व भ्रष्टाचार विरोधात सिंधुदुर्ग वासियांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

