🛑सावंतवाडीत वक्तृत्व स्पर्धा,अभिवादन कार्यक्रम.
*🛑सावंतवाडीत वक्तृत्व स्पर्धा,अभिवादन कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एका न्यायालयीन कामासाठी सावंतवाडी संस्थानला भेट दिली होती. या भेटीतच त्यांनी २२ ऑक्टोबर,१९३२ रोजी गोवा ते राजापूर असा कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित केला होता. या भेटीचे औचित्य साधून येथील समता प्रेरणाभूमीने स्मृती विचार संवर्धन वक्तृत्व स्पर्धा व अभिवादन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भेटीला चालू वर्षी ९३ वर्षे पूर्ण होत असून लवकरच या भेटीचे शताब्दी वर्षही पूर्ण होणार आहे. रविवार, १९ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान तथा समता प्रेरणाभूमी येथे सकाळी १०.३० वाजता ‘स्मृती विचार संवर्धन खुली वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी वैभवकुमार अंधारे यांच्या हस्ते होणार आहे. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा तथागत नागरी पतसंस्थेचे चेअरमन अरविंद वळंजु हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता प्रेरणाभूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर असणार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या भेटीच्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनही केले असून या दोन्ही कार्यक्रमांना आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन समता.प्रेरणाभूमीचे कार्याध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष भावना कदम,सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

