उद्योजक मुबीन खोत व वहाब बेबल आयोजित चिपळूण प्रिमियर लिग स्पर्धेचा शुभारंभ..
▪️ राज्यातील १२ नामांकित संघांचा राहणार सहभाग..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१४: शहरातील पवन तलाव मैदानावर रविवार १४ फेब्रुवारी रोजी चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या हस्ते उद्योजक मुबीनभाई खोत व वहाब बेबल मित्रमंडळ आयोजित भव्य ओव्हरआर्म चिपळूण प्रिमियर लिग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच उदघाटन संपन्न झाले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक नासिरभाई खोत, गुलामभाई तांडेल, मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रान कोंडकरी, नाझीम अफवारे, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, मिरजोळी सरपंच कासम दलवाई, क्रिकेट प्रशिक्षक संतोष चव्हाण, विनोद झगडे, आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजक मुबीनभाई खोत व वहाब बेबल,विशाल सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले.
या स्पर्धेमध्ये नामांकित १२ संघ सहभागी झाले असून साखळी पध्दतीने सामने होणार आहेत. खेळाडूंसह प्रेक्षकांसाठी हजारो रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून हे स्पर्धेचे खास आकर्षण आहे. गेल्या अनेक वर्षापासून होणारी ही स्पर्धा लोकप्रिय आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ५५ हजार २१ रूपये, उपविजेत्यास ३३ हजार २१ रूपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.तसेच मालिकावीरास एलईडी टिव्ही, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना स्मार्ट फोन व सामनावीरास बॅट व टीशर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडू खेळणार असल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी चिपळुणातील क्रिकेट प्रेमीना लाभणार आहे. सकाळ पासून सुरू होणाया या स्पर्धेचा प्रत्येक सामना ६ षटकांचा राहणार असून या स्पर्धा भव्यदिव्य करण्यासाठी आयोजक प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेचं नेटकं समालोचन नामवंत समालोचक बाबल्या जाधव आणि इब्राहिम सरगुरो हे करत आहेत.
या स्पर्धेचे टेनिस क्रिकेट डॉट इन या युट्युब चॅनलवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्याचाही फायदा क्रीडारसिकांना होणार आहे. चिपळुणातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन व राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ चिपळूणवासियांना पाहता यावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्ध उद्योजक मुबीन खोत व वहाब बेबल यांनी सांगितले.या स्पर्धेला दरवर्षी क्रीडारसिकांचा मोठा प्रतिसाद लाभतो. मात्र यावर्षी कोरोनाची भीती असल्याने शासनाचे सर्व नियम पाळून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेत क्रीडारसिकांचा सन्मान व्हावा, यासाठी यावर्षी लकी ड्रॉच्या माध्यमातून क्रीडारसिकांची निवड करून त्यांना १५ हजार रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. हे या स्पर्धेचे वेगळेपण राहणार आहे.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

