राणेंच्या सन्मानाने पोटशूळ उठलेल्या शिवसेनेचा कोकणात ‘धैकाला’; भाजपा महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा टोला..

▪️जनतेने जोडे मारत नाकारलेल्या जान्हवी सावंतनी आता जगावर जोडे मारत फिरू नये..

▪️राणेंना विरोध करून नेते खुश होतात,पण जनता नाही,हे एव्हाना कळायला हवे होते..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१४: उच्चस्तरीय भाजपा नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांंची भेट घेण्यासाठी मोठमोठे नेते तिष्ठत बसलेले असतात. अशा या नेत्याने ना.नारायणराव राणे यांंचे आमंत्रण स्वीकारत सिंधुदुर्गाला भेट दिली. त्यांच्या कामाचे कौतुक केले. आधीच राणेद्वेषाची कावीळ झालेल्या शिवसेनेला  देशपातळीवर खा.राणे यांचे वाढलेले वजन पाहून पोटशूळ उठणे साहजिक होते आणि या पोटशूळाच्या वेदना खा. विनायक राऊत यांच्या तोंडातून बाहेर पडल्या. कोकणात स्वतः काही करू शकत नाहीत आणि करणाऱ्याला करू द्यायचे नाही, अशा नतद्रष्ट मनोवृत्तीच्या विनायक राऊतांनी राणेंवर खालच्या पातळीवर उतरत टीका केली. भाजपा कार्यकर्त्यांना याचा संताप येणे साहजिकच असताना त्या आगीत तेल ओतण्याचे काम या धैकाल्यातल्या संकासुर वैभव नाईक यांनी केले. भाजपा कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांना जोडे मारावेत हीच त्यांची त्यामागची सुप्त इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण करून घेतली. हल्ली काहीच काम न उरलेल्या शिवसेनेच्या महिला नेत्या जान्हवी सावंत यांनी या आयत्या रंगमंचावर नाचून घेतले. जनतेने आपल्याला मतदार संघातून जोडे मारून हाकलून दिले आहे हेदेखील त्या विसरल्या.  राणेसाहेबांवर टीका करून आणि असली जोडे-मारीची स्टंटबाजी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांनी काम करावे, नेत्यांना खुश करुन करियर होईल या भ्रमात वावरत दिवा-स्वप्न पहायची सोडून द्यावीत, यातच त्यांचे हित आहे. राणेंच्या द्वेषातून जिल्ह्यात कितीही “धैकाला” घातलेत तरी विजयाची हंडी भाजपाच फोडणार आणि त्याची सुरुवात या जिल्ह्यातुन झालेलीच आहे, असा सणसणीत टोला भाजपा सावंतवाडी शहराध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!