मांगेली गावाच्या सुपुत्राला सिंधुदुर्ग जिल्हा एन.सी.सी. फर्स्ट अधिकारी होण्याचा मान..
▪️५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अधिकारी गोपाळ गवस यांना पदोन्नती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१४: महाराष्ट्र राज्यातील एकूण वीस अधिकाऱ्यांना महानिदेशक राष्ट्रीय छात्र सेना वेस्ट ब्लॉक ४ आर.के. पुरम नवी दिल्ली यांच्याकडून सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांना प्राप्त झालेल्या पत्रानुसार पदोन्नती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील एकूण वीस अधिकाऱ्यांना महानिदेशक राष्ट्रीय छात्र सेना वेस्ट ब्लॉक ४ आर.के. पुरम नवी दिल्ली यांच्याकडून सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांना प्राप्त झालेल्या पत्रानुसार पदोन्नती देण्यात आली. अखंड सलग दहा वर्षे राष्ट्रीय प्रशिक्षण नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील रिफ्रेशर कोर्समध्ये अव्वल श्रेणी मिळवून यश संपादन केल्या बद्दल त्यांना पदोन्नतीने सन्मानित करण्यात आले.
५८ एनसीसी बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल नरेश कुमार व प्रशासकीय अधिकारी कर्नल सी.एस.के. लेखराज यांच्या हस्ते फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांच्या खांद्यावर बॅच सन्मानपूर्वक सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संस्थांच्या महाविद्यालयीन व शालेय स्तरावरील एनसीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावण्यात आले. फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५८ एनसीसी मधील पहिले फस्ट ऑफिसर झाल्याचा मान मिळविल्याचे यावेळी कर्नल नरेश कुमार यांनी आवर्जून उल्लेख केला व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी नागपूर मध्ये अव्वल श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल मागील वर्षी कोल्हापूर ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर बी डोग्रा यांनी प्रशंसा पत्र देऊन गवस यांचे कौतुक केले होते.
या प्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्था अध्यक्ष शैलेश पई संस्था सचिव डॉ.प्रसाद नार्वेकर सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीचे मुख्याध्यापक एन.पी मानकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गवस यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_