🛑नगरपरिषद कंत्राटी कामगारांचा संप १५ दिवस स्थगित.
*🛑नगरपरिषद कंत्राटी कामगारांचा संप १५ दिवस स्थगित.*
*🛑ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यास प्रशासकाचा अधिकृत आदेश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* प्रांताधिकारी व नगरपरिषद प्रशासक हेमंत निकम यांच्याशी झालेल्या तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर अखेर नगरपरिषद कंत्राटी कामगारांचा संप १५ दिवसांसाठी स्थगित करण्यात आला. या चर्चेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवणारे ठरले.
निकम यांनी चर्चेदरम्यान कंत्राटी कामगारांचा तब्बल ६५ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी बुडवलेल्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नगरपरिषद अधिकाऱ्याला अधिकृतपणे अधिकार दिला. तसेच दोन नवीन मिनिमम वेजेस प्रमाणे टेंडर काढण्याचे आदेश तातडीने देण्यात आले. यापुढे कंत्राटी कामगारांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचे निर्देशही निकम यांनी दिले. याशिवाय, या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (EOW) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली असून, त्यांच्या आश्वासनाला मान देत कंत्राटी कामगारांनी संप तात्पुरता मागे घेतला.
या आंदोलनाला बळ देण्यासाठी माजी नगरसेवक विलास जाधव, नगरसेविका अफ्रोच राजगुरू, नगरसेवक सुरेश भोगटे, मराठा महासंघाचे मनोज घाटकर, उमेश खटावकर, जॉनी फर्नांडिस, सचिन माडये, अभय पंडित, श्रमिक संघाचे कॉ. धोंडीबा कुंभार, शिवसेनेचे पदाधिकारी निशिकांत तोरसेकर, ऍड. अनिल केसरकर, कामगार प्रतिनिधी बाबू बरागडे, कायदे तज्ज्ञ ऍड. अनिल निरवडेकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
याचबरोबर पत्रकार बांधवांचे योगदान सर्वांत मोठे ठरले. भर पावसात तब्बल १२ तास वृत्तांकन करून प्रिंट व सोशल मीडियामार्फत आंदोलनाचा आवाज राज्यभर पोहोचवला. या पाठिंब्यामुळेच आंदोलनाला गती मिळाली, असे कामगारांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुमारे ८०० नागरिकांनी दिवसभर आंदोलनस्थळी हजेरी लावून कामगारांना मानसिक बळ दिले. तर सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेविका शर्वरी धारगडकर, कीर्ती बोंद्रे, शुभांगी सुकी, भारती मोरे, रागिनी सावंत सासोलकर व इतरांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.१५ दिवसांनी तोडगा निघाला नाही, तर संप पूर्ववत सुरू करू असा इशारा कामगारांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

