आपत्कालीनकणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

पुण्याहुन तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारची दोन वयोवृध्दांना धडक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१३: पुण्याहुन तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसुन दोन वयोवृद्ध पादचारी गंभीर जखमी झाले. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कणकवली प्रांताधिकारी कार्यालयानजीक नॅशनल हायवेवर हा अपघात घडला.

अपघातानंतर कारचालकाने अपघातस्थळावरून कारसह पळ काढला. नरडवे फाट्यावर पोलिसांच्या दंगा काबु पथकाकडे जाऊन कारसह करचालक थांबला. लातुरमधील दोन युवक आपल्या दोन मैत्रिणींसह पर्यटनासाठी भाड्याची कार घेऊन पुण्याहुन तारकर्लीला निघाले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटुन रस्त्यावरून चालणाऱ्या दोन वयोवृद्धां ना कारची जोरदार धडक बसली. दोन्ही वृद्ध जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी उपनिरीक्षक जगदीश बांगर, एपीएसआय विनायक चव्हाण,चालक एपीएसआय राजु उबाळे यांच्यासह तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. जखमी वृद्धांना ऍम्ब्युलन्समधुन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर कारचालकासह सहकारी पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!