आपत्कालीनकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

आजरा नजीक कार अपघातात कुडाळ येथील एक ठार, एक गंभीर व तीन किरकोळ जखमी..

▪️महाबळेश्वर येथून पर्यटन करुन परतत असताना कार वरील ताबा सुटून अपघात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१४: ओंकार वालावलकर आपल्या भावाची गाडी घेऊन पर्यटनासाठी महाबळेश्वर येथे मित्रांना घेऊन गेला असता पर्यटन करून परतत असताना आजरा नजीक ओमकार यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलटी मारल्या  यात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २२) हा जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. तर तिघांना किरकोळ दुखापत झाली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओमकार वालावलकर आपल्या मित्रांना घेऊन आपल्या भावाच्या गाडीने महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेला होता. महाबळेश्वर येथील पर्यटन स्थळे पाहून परतत असताना गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ओंकार वालावलकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने तीन पलटी मारल्या या अपघातात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २२) हा जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असणारे रोहन कुंभार, पायल परब, जगन्नाथ पेडणेकर हे जखमी झालेत. जखमींना गडिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच कुडाळ येथील सुशील चिंदरकर सह अन्य काहीजण घटनास्थळी पोहोचले व आजरा  पोलीस स्थानकात धाव घेतली. अपघातात मृत्यू पावलेल्या रोहन रोहित कुडाळकर हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याचे वडील अपंग आहेत. या घटनेने कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!