कुर्ली-घोणसरी-फोंडा मार्गावरील एस.टी. बस फेऱ्या पूर्वी प्रमाणे सुरू करा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१३: फोंडा, घोणसरी ,कुर्ली मार्गावरील पूर्वी प्रमाणे एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुर्ली सरपंच दर्शना पाटील, उपसरपंच अंबाजी हुंबे व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.
कुर्ली, घोणसरी,फोंडा मार्गावरील दुपारी १२:३०, २:३० व संध्याकाळी ५:३० वाजता सुटणाऱ्या एस.टी. बस फेऱ्या कोरोना संसर्ग सुरू झाल्या पासून बंद आहेत.आता लोकडाऊन उठले आहे.सर्व व्यवहार पूर्वी प्रमाणे सुरू झाले आहेत.शाळा, कॉलेज व नोकरदार यांना सुरक्षित व स्वस्त प्रवास म्हणून एस.टी. प्रवासाला प्राधान्यक्रम दिला जातो. सध्या दुपारनंतर प्रवाशांची गैरसोय होत आहे .सकाळी फोंडाघाट किंवा अन्य ठिकाणी गेलेले व्यक्तीना संध्याकाळ शिवाय घरी परत येऊ शकत नाही. वयोवृद्ध महिला ,पुरुष ,आजारी रुग्ण, शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. एसटी बस दुपारच्या वेळेत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.तरी परिवहन महामंडळ कणकवलीच्या विभाग नियंत्रक यानी कुर्ली ,घोणसरी ,फोंडा मार्गावरील पूर्वीप्रमाणे एसटी वाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी कुर्ली ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली आहे.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_