राजू धारपवार यांची सावंतवाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या तालुकाअध्यक्षपदी व अभिषेक पवार यांची युवक शहरअध्यक्षपदी निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१३: राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.प्रफुल्ल सुद्रीक यांनी राजू धारपवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर त्यांच्यावर यूवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान राजू धारपवार यांची सावंतवाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या तालुकाअध्यक्षपदी व अभिषेक पवार यांची युवक शहरअध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राजू धारपवार यांचा सावंतवाडी शहरात आणि तालुक्यात युवा वर्गामध्ये चांगला जनसंपर्क आहे आणि ते सामजिक कार्यात अग्रेसर असतात.यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष श्री.अमित सामंत यांच्या कार्यप्रणाली वर प्रभावित होऊन त्यांनी आज सावंतवाडी येथे राष्ट्रवादी तालुका पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते श्री.अर्षद बेग यांच्या माध्यमातून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर सावंतवाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाअध्यक्ष पद देऊन योग्य तो सन्मान राखला.
ही निवड आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूका नजरेसमोर ठेऊन महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाअध्यक्ष अमित सामंत,युवक जिल्हाअध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी,उपस्थित होते.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

