सिंधुदुर्गात काँग्रेस स्वबळावर लढणार पक्षश्रेष्ठींचा निर्णय
*🛑सिंधुदुर्गात काँग्रेस स्वबळावर लढणार पक्षश्रेष्ठींचा निर्णय*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग :३ डिसेंबर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी व देवगड या नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार असुन काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक काल (गुरुवारी) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, मुंबई येथे संपन्न झाली. त्यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अ.भा.काँग्रेसचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, माजी मंत्री व कार्याध्यक्ष नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई व भाई नगराळे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पाण्डेय, प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी विनायक देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, सहप्रभारी शशांक बावचकर, निरीक्षक इब्राहिम दलवाई, ज्येष्ठ नेते दादा परब, समीर वंजारी आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. ही निवडणुक पुर्ण ताकदीने लढविण्यात येणार असुन प्रदेश काँग्रेस कडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली
प्रारंभी प्रभारी विनायक देशमुख यांनी सांगितले, ” दि. १० नोव्हेंबर रोजी प्रभारीपदी नियुक्ती झाल्यावर मागील २० दिवसात आपण तीन वेळा सिंधुदुर्गचे दौरे केले. आठ पैकी सहा तालुक्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात पोषक वातावरण असुन स्वबळावर निवडणूक लढविल्यास पक्षाला चांगले यश मिळेल.” जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी चार नगरपंचायत क्षेत्रातील सर्व म्हणजे ६८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केले. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल येतील, अशी ग्वाही दिली.” निरीक्षक इब्राहिम दलवाई यांनी जिल्ह्याचा निरीक्षण अहवाल निवड मंडळासमोर सादर केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दादा परब (वय वर्षे ८ १) पोटतिडकीने भावना व्यक्त करताना म्हणाले, सिंधुदुर्ग हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे. यापूर्वी घडलेल्या काही राजकीय स्थित्यंतरामुळे काँग्रेस पक्षावर सध्याची वेळ आली आहे. मात्र प्रभारीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर श्री. देशमुखांनी ज्या कुशलतेने व तडफेने काम सुरू केले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. आता राज्यातील नेत्यांनी सहकार्य केल्यास जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_