कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन सीटू संलग्न सोमवारचा जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा रद्द; सचिव विजयाराणी पाटील

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴सिंधुदुर्ग,दि.१३: जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांचा, नोव्हेंबर २० ते मार्च २१ या कालावधीतील थकित मोबदला व इतर मागण्यांसाठी सोमवार दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे मोर्चा काढण्यात येणार होता. पण थकित मोबदला देण्यासाठी राज्य सरकार कडून मंजुरी देण्यात आली असल्याने सीटू संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या प्रयत्नांना यश आले आहे. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांचे अभिनंदन करून सदर मोर्चा रद्द करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या सचिव विजयाराणी पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सिटू संलग्न यांच्या आदेशाने जिल्हा स्तरावरील सर्व आंदोलने रद्द करण्यात येत आहेत. व इतर मागण्यांच्या मंजुरीसाठी फेडरेशनचा पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारा जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील मोर्चा रद्द करण्यात येत आहे. याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी नोंद घ्यावी. असे सचिव विजयाराणी पाटील यांनी कळविले आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!