खांबाळे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या गौरी पवार तर उपसरपंचपदी गणेश पवार यांची बिनविरोध निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴वैभववाडी,दि.११: खांबाळे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या गौरी गणेश पवार तर उपसरपंचपदी गणेश प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायत मध्ये शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनल चे ९ पैकी ९ सदस्य निवडून आले होते. या सर्व सदस्यांन मधून सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सी. जी. इंगळे यांनी काम पाहिले. सरपंच, उपसरपंच निवड झाल्यावर शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी सरपंच, उपसरपंच तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्य यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड, अमोल चव्हाण, मंगेश ( बंड्या ) गुरव, प्राजक्ता कदम, रसिका पवार, भारती बोडेकर, दर्शना मोरे तसेच माजी सरपंच विठोबा सुतार, माजी चेअरमन दिपक चव्हाण, माजी सरपंच सारिका सुतार, माजी उपसरपंच लहू साळुंखे,अशोक पवार, प्रमोद लोके, गंगाराम अडुळकर, रुपेश कांबळे, भगवान कांबळे, बाबाजी देसाई, प्रसाद कदम, शांताराम कदम, विश्वनाथ मोहिते, राजेंद्र पवार, दिपक पवार, जयेश पवार, गणेश पवार, छोटू गुरव, सत्यवान सुतार,मेघ्नेश पवार आदी बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

