वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यात १३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या १०३ जागा पैकी भाजपच्या २८ जागा बिनविरोध..

▪️मांगवली ग्रामपंचायत भाजपने बिनविरोध राखल्याची तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.३१: तालुक्यात १३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या १०३ जागा पैकी भाजपच्या २८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर मांगवली ग्रामपंचायत भाजपने बिनविरोध राखली आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.

येथील पक्ष कार्यालयात नासीर काझी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, पं. स. सदस्य अरविंद रावराणे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी आदी उपस्थित होते. ४ जानेवारी ही तारीख अर्ज माघारीची आहे. या तारखेपर्यंत बिनविरोधचा आकडा दुप्पट झालेला असेल. तसेच या पुढे ही पक्षप्रवेश मालिका सुरू राहणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील दिग्गज पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे काझी यांनी सांगितले. वैभववाडी तालुका शत-प्रतिशत भाजप या निवडणुकीत पाहायला मिळेल. गावागावात विरोधी पक्षातील उमेदवार ही भाजपा पुरस्कृत पॅनेलमध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु भाजपाचे भक्कम उमेदवार पॅनल मध्ये असल्याने त्यांच्या जागी विरोधकांना संधी देणे अडचणीचे बनले आहे. १३ पैकी १३ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकेल असे काझी यांनी सांगितले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!