आंबोली,मळगाव,कोलगाव व चौकुळ मध्ये भाजप चे सरपंच व उपसरपंच विराजमान..
▪️भाजप संघटनेच्या ताकदीमुळे मिळाले यश; तालुकाध्यक्ष संदिप गावडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली,दि.११: भाजप मंडळात चार ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच उपसरपंचांची निवड झाली असून संदीप गावडे यांच्या नेतृत्वात लढलेल्या या चारही ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे उपसरपंच उपसरपंच विराजमान झाले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे व संघटनेच्या ताकतीवर आंबोली भाजप तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनी जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांचा आदर ठेवत तसेच नवीन युवक कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवले असून चौकुळ गावात प्रथमच भाजपचे सरपंच म्हणून सुरेश विष्णू शेट्ये तर उपसरपंच म्हणून संजना संजय गावडे यांची निवड करण्यात आली आंबोली ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून बाळा पालेकर तर उपसरपंच म्हणून दत्तू नार्वेकर यांची निवड करण्यात आली या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या सत्तेला सुरुंग लावून यश मिळवण्यात भाजपचे कार्यकर्ते यशस्वी झाले .कोलगाव ग्रामपंचायत मध्ये महेश सारंग यांच्या यशस्वी रणनीती मुळे शिवसेनेकडे असलेली ग्रामपंचायत एक तर्फी भाजपच्या दिशेने वळवण्यात महेश सारंग यशस्वी ठरले असून सरपंच म्हणून संतोष राऊळ तर उपसरपंच म्हणून दिनेश सारंग यांची निवड करण्यात आली मळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच स्नेहल जामदार तर उपसरपंच म्हणून हनुमंत पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे भाजपच्या सर्व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे मंडळ तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

