कृषिवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

काजू बी ला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्री,आमदार यांचा २५ रोजी वाशी येथे सत्कार..

▪️महाराष्ट्र कॅशु मॅन्यूफॅकचरर्स संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांची आयोजित पत्रकार परिषदेत माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.१०: काजूचा साडे बारा टक्के कर ५ टक्यावर आणल्याने महाराष्ट्रातील काजू उद्योगाला आर्थिक पाठबळ मिळाले आहे. तसेच खेडयातील महिला-पुरुषांना रोजगार मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या काजू बी ला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्नशील असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह असोसिएशनच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणारे मंत्री व आमदार यांचा सत्कार महाराष्ट्र कॅशु मॅन्यूफॅकचरर्स असोसिएशनच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी वाशी-नवी मुंबई येथे श्री लक्ष्मी वेंकटरमन मंदिर हॉल येथे आयोजित केला आहे. अशी माहिती महाराष्ट्र कॅशु मॅन्यूफॅकचरर्स संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वेंगुर्ले येथील महाराष्ट्र कॅशु मॅन्यूफॅकचरर्स असोसिएशनच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्याचे आले होते. यावेळी बोलताना श्री. बोवलेकर म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, माजी वित्त व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

भारतात पहिला काजू उद्योग वेंगुर्लेत सुरू झाला. त्यावेळी दाजीबा तोरणे, श्री. झाट्ये, श्री. शिरोडकर यांनी वेंगुर्लेत काजू उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ३२ रुपये भाव असलेल्या काजू बी आता १४० ते १४५ एवढा भाव मिळत आहे. काजू उद्योजकांनी उत्पादीत केलेल्या मालाला मागणी वाढल्यावर नव उद्योजकांची संख्या वाढत गेली. परिणामी शेतकऱ्यांच्या काजू बी ची मागणी वाढत गेली व योग्य भावही मिळाला. शेतकऱ्यांबरोबरच या काजू उद्योजकांमुळे गावातील महिलांना व पुरुषांना गावातच रोजगार मिळाला तसेच त्यांना आर्थिक स्थर्य ही मिळाले. वाहतूक दारांना ही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. काजू बी ची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी काजू बी चे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. त्यामुळेच नर्सरीत काजू पिकाची मागणीही वाढली. हे काजू उद्योजकांमुळे सहज शक्य झाले.

काजू कारखानदार सबळ झाल्याने शेकऱ्यांच्या काजू बी ला चांगला भाव मिळू लागला. त्यामुळे लहान मोठ्या काजू कारखानदारांनी संघटित होणे गरजेचे आहे. त्याचा फायदा काजू उद्योजक तसेच काजू शेतकरी व काजू प्रकिया उद्योगातून तेथील महिलाना रोजगार निर्मितीच्या माध्यमातून होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काजू उद्योगावरील योग्य धोरण निश्चित केल्याने काजू उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या देशात १९ लाख मॅट्रिक टन काजू बी ची आवश्यकता असून आपल्या देशात फक्त ८ लाख मॅट्रिक टन एवढ्याच काजू बी चे उत्पादन होत आहे. त्यामुळे काजू बी ची आवश्यकता लक्षात घेता काजू पिकाच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे.त्यासाठी काजू बी ला गोव्या प्रमाणे हमीभाव अपेक्षित आहे. तसेच काजू बोंडावर प्रक्रिया करून विविध उत्पन्न करणे. काजूच्या चोथ्यावर फॉरेन कंट्रीत बिस्कीट तयार होतात. त्याप्रमाणे उद्योग महाराष्ट्रात येणे गरजेचे असून प्रक्रिया उद्योगा संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. भविष्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास काजू उद्योगास चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी बोवलेकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र कॅशु मॅन्यूफॅकचरर्स असोसिएशनचे राजू बांदेकर, श्रीकाण राणे, सिद्धार्थ झाट्ये, विश्वनाथ मांजरेकर, सुधीर झाट्ये,आदी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!