🛑सिंधुदुर्गातील एस टी मंडळाचा बेभरोशी कारभार..जिल्ह्याला डी सी नाही.
*🛑सिंधुदुर्गातील एस टी मंडळाचा बेभरोशी कारभार..जिल्ह्याला डी सी नाही.*
*🛑जुन्या गाड्यांना सी एन जी बसविल्यामुळे गाड्या पडताहेत वाटेत बंद.*
*🛑वेंगुर्ला आगारची सकाळची वेंगुर्ला कोल्हापूर गाडी एकाच महिन्यात पडली दोन वेळा वाटेत बंद.*
*🛑आगाऊ बुकिंग करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फुकट मनस्ताप सुमारे ७० किमी करावा लागला उभे राहून प्रवास.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* सिंधुदुर्ग एस टी महामंडळाचा बेभरोशी कारभार चालला असून या महामंडळाला सिंधुदुर्गात डीसी नसल्यामुळे सदरचा चार्ज रत्नागिरी डीसी कडे देण्यात आला आहे, ते आठवड्यातून दोन वेळा सिंधुदुर्गात येतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक डेपोचे वेळापत्रक कोलमडले आहे. वेंगुर्ला डेपोची सकाळी सावंतवाडीतून ६:१० ला सुटणारी वेंगुर्ला कोल्हापूर गाडी गेल्या व या महिन्यात दोन वेळा वाटेतच बंद पडल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गातील अनेक जुन्या गाड्यांना सीएनजी किट बसविल्यामुळे या गाड्या बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. वेंगुर्ला कोल्हापूर गाडी हे अनेक जण आगाऊ बुकिंग करून प्रवास करतात मात्र ही गाडी दोन वेळा वाटेतच बंद पडल्यामुळे सुमारे एक दीड तासानंतर दुसऱ्या गाडीतून उभे राहून प्रवाशांना प्रवास करावा लागला व ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांना भाडेही परत मिळत नाही त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या तरी निदान व्यवस्थित द्याव्यात जेणेकरून प्रवास सुखर होईल असे प्रवाशांचे म्हणणे आहे, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या अनेक वेळा वाटेतच बंद पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.याबाबत चौकशी केली असता जुन्या गाड्यांना सीएनजी कीट बसविल्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले मात्र सिंधुदुर्ग एस टी महामंडळाला जिल्हा वाहतूक नियंत्रक नसल्याने या महामंडळाचा कारभार बेभरोशी झाला आहे.
सावंतवाडी एस टी डेपोला तर कोण वालीच नाही, डेपो मॅनेजर असून नसल्यासारखे आहेत, त्यांना प्रशासनातील अनुभव नसल्याने तेथील काहीजण आपल्यालाच अधिकारी समजून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून गाड्या सुरू ठेवायच्या की बंद करायच्या हे आपणच ठरवून महामंडळाच्या कारभाराचा बट्ट्याबोळ केला आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी आगाराला धडक देत जर कोण कर्मचारी एसटी महामंडळाचा गणवेश घालत नसेल तर त्याला आमचा हिसका दाखवावा लागेल असा इशारा दिला होता त्यानंतर सदर कर्मचारी गणवेश घालायला लागल्याची माहिती मिळाली आहे.
एकंदरीतच सिंधुदुर्ग एसटी आगाराला कोण वाली नसल्याने आगाराचा कारभार बेभरोशी झाल्याने त्याचा फटका मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे ,आज सकाळी सावंतवाडीहून ६ वाजून १० मिनिटांनी सुटणारी वेंगुर्ला आगाराची वेंगुर्ला कोल्हापूर गाडी निपाणी येथे बंद पडली, सुमारे दीड तासानंतर सदरच्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये कोंबून नेण्यात आले त त्या गाडीतील प्रवाशांनी प्रवास आरामदायक व्हावा म्हणून आगाऊ बुकिंग केले होते त्यांनाही या एसटी महामंडळाच्या गलथान करावामुळे उभे राहून प्रवास करावा लागला.वेंगुर्ला आगाराची वेंगुर्ला कोल्हापूर ही सकाळची एस टी दोन वेळा बंद पडली त्यामुळे वेंगुर्ला आगाराच्या कार्यशाळेत एसटी सुस्थितीत आहे की नाही हे तपासून दिले जाते की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकारात जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी लक्ष घालून सुधारणा करावी अशी प्रवाशांनी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

