Uncategorized

माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

सावंतवाडी, ०४: येथील माठेवाडा परिसरातील एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्रिया चव्हाण (वय ३०) असे तीचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.याबाबत अधिक माहीती अशी की, माठेवाडा- आत्मेश्वर मंदिरच्या मागे असलेल्या इमारतीत हे चव्हाण कुटुंब राहत आहे. तिचा पती कामानिमित्ताने पुणे येथे राहतो. दरम्यान रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर तिने घरातून आतून दरवाजा बंद करून नेहमीप्रमाणे ती झोपी गेली. मात्र सकाळी दरवाजा उघडला नाही. तिचा कोणताही प्रतिसाद आला नसल्याने दरवाजा फोडून खात्री केली असता तिचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.
दरम्यान तिने आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकलेल नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. संबंधित विवाहिता ही फार्मसिस्ट होती. सालईवाडा येथील एका मेडिकलमध्ये ती काम करत होती. तिला एक लहान मुलगी आहे. घरात सासू, सासरे, लहान मुलगी असा परिवार राहत होता. तिने अचानक अशा प्रकारचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात शोककळा पसरली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार मनोज राऊळ, अनिल धुरी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!