खेर्डीच्या सरपंचपदी सुखाई परिवर्तन पॅनलच्या वृंदा दाते तर उपसरपंचपदी विजय शिर्के यांची बिनविरोध निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०९: संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या नुकत्याच झालेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनलच्या ११ उमेदवारांनी विजय मिळवित ग्रामपंचायतीवर एकतर्फी सत्ता मिळविल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगळवारी अपेक्षेप्रमाणे सुखाई परिवर्तन पॅनलच्या सौ. वृंदा विनय दाते यांची सरपंचपदी तर विजय शिर्के यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. सुखाई परिवर्तन पॅनलप्रमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदंत खताते, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई, कमलाकर शेंबेकर, माजी सभापती स्नेहा मेस्त्री, शशिकांत कासार आदींची भूमिका महत्वाची ठरली आहे. तर या सर्व प्रक्रियेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव ‘किंगमेकर’ ठरले आहेत. या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तसेच खेर्डी दत्त मंदिरापासून भव्य मिरवणूक काढताना फटाक्यांची आतषबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.
खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुखाई परिवर्तन पॅनल व सुखाई गाव विकास पॅनल आमने सामने आले होते. या दोन पॅनलमध्ये अटीतटीची लढत होईल, अशी राजकिय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, मतमोजणी दरम्यान सुखाई परिवर्तन पॅनलच्या ११ उमेदवारांनी विजय मिळवित गाव विकास पॅनलला धोबीपछाड दिल्याचे समोर आले. तर सुखाई परिवर्तन पॅनलने खेर्डी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये अन्य पॅनलप्रमुखांची भूमिका महत्वाची होतीच तर चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव ‘किंगमेकर’ ठरले. खेर्डी ग्रामपंचायतवर सत्ता मिळविल्याचे स्पष्ट फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला होता. यानंतर खेर्डीच्या सरपंच व उपसरपंच पदी कोण विराजमान होणार? याची चर्चा सुरू होती. अखेर सुखाई परिवर्तन पॅनल प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य व समर्थकांच्या बैठकीत सुखाई परिवर्तन पॅनल कडून सरपंच पदासाठी वृंदा दाते व उपसरपंच पदासाठी विजय शिर्के यांच्या नावावर एकमत करण्यात आले. यानुसार खेर्डी ग्रामपंचायतीत मंगळवारी झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुक प्रक्रियेदरम्यान सुखाई परिवर्तन पॅनलकडून सौ वृंदा दाते तर उपसरपंच पदासाठी विजय शिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र सुखाई गाव विकास पॅनलकडून कोणीही या दोन्ही पदांसाठी अर्ज सादर केले नाहीत. तर या पॅनलचे सदस्य अनुपस्थित होते. यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. दुपारी दोनच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. वृंदा दाते तर उपसरपंचपदी विजय शिर्के यांची निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर ग्रामपंचायतीसमोर सुखाई परिवर्तन पॅनलच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्य तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व सुखाई परिवर्तन पॅनल प्रमुख जयंद्रथ खताते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदींनी ग्रामपंचायत सभागृहातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव’ अशा घोषणा देऊन परिसर ददणाणून सोडला. यानंतर या सर्वांसह उपस्थितीतांनी नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विनोद भुरण, सचिन मोहिते, अभिजीत खताते, सुप्रिया उतेकर, सुगंधा माळी, अश्विनी पंडित, अपर्णा दाते, प्रकाश प्रकाश पाथरूड, वैशाली मोरे वैशाली मोरे यांच्यासह माजी उपसरपंच सुनील मेस्त्री, बाळा दाते, माजी उपसरपंच रवींद्र फाळके संतोष उतेकर, अजित खताते, प्रकाश खताते, अरविंद कापडी, शुभम खताते, प्रदीप भुरण, महेंद्र डीगे, गजानन जाधव, संतोष सुर्वे, अनिल लांजेकर, श्रीकृष्ण राऊत, मंगेश पवार, अनिल फाळके, विश्वनाथ फाळके, काशिनाथ दाते, अण्णा दाते, मिलिंद मोहिते, संदेश मोहिते, सुरेश दाते, संतोष सुर्वे, अवधूत खताते, मनोज दाभोळकर, सतीश पंडित, रणदीप पवार, अमित दाभोळकर, वासुदेव मेस्त्री, गोकुळ दाते, नितीन खताते, शांताराम भुरण, अनंत भुरण, बाळू शिंदे, माजी सरपंच जयश्री खताते, माजी सभापती स्नेहा मिस्त्री दाभोळकर, सौ स्वप्ना यादव, आदी उपस्थित होते. यावेळी सुखाई परिवर्तन पॅनल समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या सर्वांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_