*▪️ राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभाग विशेष कृती दल सिंधुदुर्ग रत्नागिरी यांनी पकडली सात लाखाची दारू*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या उठावाला यश विशेष कृती दल स्थापन*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*शैलेश गवस*
*🎴बांदा :*
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात छुप्या पद्धतीने बेकायदेशीर रित्या केल्या जाणार्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुलि तसेच राज्य उत्पादन शुल्क विशेष कृती दल( सिंधुदुर्ग – रत्नागिरी) खात्याने एकत्र कारवाई केली. या कारवाईत ६ लाख ६७ हजार २८० रुपयांच्या दारुसह ६ लाख रुपयांच्या दोन चारचाकी असा एकूण १२ लाख ६७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र अंधाराचा फायदा घेत संशयीत तेथून पळून जाण्यास यशस्वी झाले. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईती दोन चारचाकी (एमएच ४३ व्ही ४७३९) व (जीए ०५ डी २४८२) ह्यां गाड्यांना ताब्यात घेण्यात आले असून, फरार झालेल्या संशयीताना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यानं कडून सांगण्यात येत आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली पथकप्रमुख व्ही व्ही रोकडे,प्रविण माने, दुय्यय निरीक्षक विश्वजीत आभाळे, शिवाजी काळे, अविनाश पाटील, जवान ज्योतिबा पाटील,केतन वझे, अर्जुन कापडे, शाहरुख तडवी,सचिन पैठणकर,सुशील परब, शरद साळुंखे, चालक साजीद मुल्ला, वसंत घुंगरे, संदीप कदम यांनी केली
फोटो :- जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालसह राज्य उत्पादन शुल्क कर्मचारी (शैलेश गवस)
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

