आणखीकणकवलीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

प्लॅस्टिक बाटलीतुन आणलेले पेट्रोल वाहतूक पोलिसांच्या अंगावर फेकले…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २० शहरातील पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतुक पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने यांच्या डोळ्यात युवकाने पेट्रोल ओतून आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न केला.

प्लॅस्टिक बाटलीतून आणलेले पेट्रोल त्या युवकाने हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या अंगावर ओतले. आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच, बाजूला उभे असलेल्या आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे यांनी त्या युवकाची गचांडी पकडुन त्याला पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांवर हल्ला केलेल्या त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, अधिक चौकशी सुरू केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने कणकवली शहरासह, पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार आज संध्याकाळी ५.३० च्या सुमारास घडला आहे. युवकाने तोंडाला मास्क लावले नव्हते. म्हणुन ऑन ड्युटी वाहतुक पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने कुणाचं न ऐकत, त्यांच्याशी हुज्जत घालत. रागाने हातात असलेली पेट्रोलची बाटली उघडली आणि त्यांच्या डोळ्यात पेट्रोल फेकले.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!