सेटटॉप बॉक्स तयार करण्यासाठी ५०० जणांना रोजगार मिळणार; आ. दीपक केसरकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०७: जम्प नेटवर्क सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यात जाळे विणेल, त्यामुळे आयटीच्या शैक्षणिक सुविधा निर्माण होतील असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी शहरांमध्ये मेक इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर सेटटाप बॉक्स तयार करण्यासाठी ५०० जणांना रोजगार मिळणार असून तीन शिफ्टमध्ये मार्चच्या दरम्यान सेटअप बॉक्स उत्पादन प्रकल्प सुरू होईल असा विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला.

या शहरांमध्ये एखादी गोष्ट व्हायला वेळ लागतो मात्र भविष्यात त्याची भरभराट होते, जम्प नेटवर्कही येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला महत्त्वाचा दुवा ठरेल,असे मत माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.जंम्प नेटवर्कच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर १०० लोकांना फ्री सेटअप बॉक्स चे वाटप आज आमदार केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जम्प नेटवर्क मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे, जंम्प नेटवर्क हेड मुकुंदन राघवन आदी उपस्थित होते.

यावेळी केसरकर म्हणाले, आपण पालकमंत्री असताना ज्या घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने केल्या होत्या त्यातील जंम्प नेटवर्क हे एक आहे, जंम्प नेटवर्कच्या माध्यमातुन लवकरच पाचशे बेरोजगारांना रोजगार देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या जंम्प नेटवर्कचे सेटअप बॉक्स चायनात तयार करण्यात आले आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात हे उत्पादन सावंतवाडी शहरात बनविण्यात येणार असून मेक इन इंडिया ही संकल्पना याठिकाणी सत्यात उतरविण्यात येणार आहे,याचे सर्व श्रेय या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांना द्यावे लागेल.

आमदार केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील मुलांमध्ये चांगले टॅलेंट आहे त्यामुळे आयटी क्षेत्रात खूप मोठी ताकद असल्याने त्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केली जात आहे सावंतवाडी सारख्या पुण्यभूमीमध्ये एखादे काम उशिराने सुरू होते मात्र नंतर त्याची नक्कीच भरभराट होते जंम्प नेटवर्कही भविष्यात येथील शैक्षणिक विकासाला आणि तरुणाच्या बुद्धिमत्तेचा चालना देणारे ठरणार आहे,

केसरकर पुढे म्हणाले, जंम्प नेटवर्कच्या माध्यमातुन सावंतवाडी शहरामध्ये फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही सेवा सुरु करण्यात येईल त्यामुळे राज्यातील फ्री वायफाय असलेले सावंतवाडी हे पहीले शहर ठरेल, त्यानंतर हळहळू संपुर्ण जिल्ह्याभरात हे जाळे विणले जाणार असुन सेटअप बॉक्सच्या माध्यमातुन एक रुपयांमध्ये एक तास असा चार्ज ग्राहकांना बसणार आहे, तसेच घरबसल्या टिव्हीवरील कार्यक्रमही कमी किंमतीत तुम्हाला पाहता येणार आहे. जम्प नेटवर्क सेटटॉप बॉक्सचा प्रकल्प उभारल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात जाळे विणले जाईल.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!