दोडामार्गराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सत्ताधाऱ्यांकडे निधी नसल्यामुळे भाजप तर्फे दोडामार्ग मध्ये ‘भिक मागो आंदोलन’..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०७: भाजप तर्फे आज सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडे विकासकामे करण्यास निधी नसल्यामुळे आज दोडामार्ग शहरात भाजप तर्फे ‘भिक मागो आंदोलन’ करण्यात आले.

बांदा ते दोडामार्ग व दोडामार्ग ते विजघर हे मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत, संचारबंदीच्या काळात आलेले वाढिव विज बिल माफ केले नाही. म्हणून भिक मागुन जमलेला पैसा बांधकाम विभाग व विद्युत विभागाला दिला जाईल. महाविकास आघाडी सरकार विकास करु शकत नाही. कारण त्यांच्या कडे निधी नाही. त्यामुळे त्यांना भिक मागुन जमलेला पैसा देण्यात येईल असे भाजपचे एकनाथ नाडकर्णी यांनी सांगितले.

विकास करण्यासाठी लवकरच महाराष्ट्रात भाजपा सरकार येणार असून खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे भाजपचे राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.

यावेळी संतोष नानचे, संजय विर्नोडकर, हडीकर, पांडुरंग बोर्डेकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!