कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

कोविड संदर्भात सर्वोतोपरी काळजी घेत आठवडा बाजार सुरु करण्यात येणार; ना.उदय सामंत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०७: स्थानिक जनता आणि व्यापारी बांधव यांच्या मागणीनुसार रत्नागिरीतील कोविडच्या पाश्र्वभूमीवर बंद केलेला आठवडा बाजार पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करताना अत्यावश्यक उपाययोजना कराव्यात आणि तयारीसाठी आवश्यक कालावधी मिळण्यासाठी आठवडा बाजार दि.६ मार्च पासून सुरू करण्यात यावा अशी चर्चा झाली. या बाजारात विक्रीसाठी फक्त स्थानिक व्यापारी बंधूंनाच परवानगी देण्यात येईल असे ठरले.ज्या व्यापारी बंधूंना बाजारात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी नगरपालिका रत्नागिरी यांच्याकडे रीतसर नाव नोंदणी करायची आहे तसेच त्यांची कोविड टेस्ट करणेही अनिवार्य असेल असे ठरले, तसेच ग्राहक वर्गानेही सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावणे आवश्यक आहे असे आवाहन करण्यात यावे असे ठरवण्यात आले.

या बैठकीला रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवार, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, आरोग्य आणि बांधकाम सभापती महेश उर्फ बाबूशेठ म्हाप, नगरपालिका आरोग्य सभापती निमेश नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!