सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांना पुन्हा एकदा यश…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंशाची अवैधपणे बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात अग्रेसर असलेले बजरंग दल सावंतवाडी यांनी कुडाळ माणगाव येथे पकडलेल्या बोलेरो गाडी च्या मालकाला 55 हजार रुपये खावटीचा खर्च भरण्याचे माननीय न्यायालयाचे आदेश.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी माणगाव येथे पकडण्यात आली होती. या गाडीतून जप्त करण्यात आलेले देशी गोवंश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सरसोली धाम येथे ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी जप्त करण्यात आलेली बोलेरो गाडी आपल्याला परत मिळावी असा अर्ज आरोपीच्या वतीने माननीय कुडाळ न्यायालयात करण्यात आला होता. यावर माननीय कुडाळ न्यायालयात ध्यान फाउंडेशन च्या वतीने वकील राजू गुप्ता वकील श्री पलाश चव्हाण वकील श्री समीर कुलकर्णी वकील श्री मिहीर भणगे यांनी माननीय कुडाळ न्यायालय आपले युक्तिवाद मांडले. आरोपी आणि गोरक्षण कार्यकर्ते यांचे वकील या दोघांचेही युक्तिवाद झाल्यानंतर माननीय कुडाळ न्यायालयाने देशी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या बोलेरो मालकाला 55 हजार रुपये खावटी खर्च जमा करण्याचे आदेश दिले आहेत .यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजरंग दल कार्यकर्ते गोरक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे . ही कारवाई बजरंग दलाचे गोरक्षा विभाग प्रमुख श्री दिनेश गावडे बजरंग दल संयोजक श्रीकृष्ण धुळपणावर श्री साईराज नार्वेकर,श्री लाडू रायका ,श्री रोहन धुरी,श्री हितेन नाईक , श्री प्रथमेश गावडे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे केली होती .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांना पुन्हा एकदा यश
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंशाची अवैधपणे बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात अग्रेसर असलेले बजरंग दल सावंतवाडी यांनी कुडाळ माणगाव येथे पकडलेल्या बोलेरो गाडी च्या मालकाला तब्बल 52, 200 रुपये एवढा खावटीचा खर्च भरण्याचे माननीय न्यायालयाचे आदेश.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी माणगाव येथे पकडण्यात आली होती. या गाडीतून जप्त करण्यात आलेले देशी गोवंश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सरसोली धाम येथे ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी जप्त करण्यात आलेली बोलेरो गाडी आपल्याला परत मिळावी असा अर्ज आरोपीच्या वतीने माननीय कुडाळ न्यायालयात करण्यात आला होता. यावर माननीय कुडाळ न्यायालयात गोरक्षण संस्था ध्यान फाउंडेशन च्या वतीने वकील राजू गुप्ता वकील श्री.पलाश चव्हाण (मालवण) वकील श्री.मिहीर भणगे यांनी माननीय कुडाळ न्यायालयात आपले युक्तिवाद मांडले. वकील श्री समीर कुलकर्णी व वकील सुनील मालवणकर यांचेही सहकार्य लाभले. आरोपी आणि गोरक्षण कार्यकर्ते यांचे वकील या दोघांचेही युक्तिवाद झाल्यानंतर माननीय कुडाळ न्यायालयाने देशी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या बोलेरो मालकाला तब्बल 52 हजार 200 रुपये एवढा खावटी खर्च जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजरंग दल कार्यकर्ते गोरक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे . ही कारवाई बजरंग दलाचे गोरक्षा विभाग प्रमुख श्री दिनेश गावडे बजरंग दल संयोजक श्रीकृष्ण धुळपनावर श्री साईराज नार्वेकर,श्री लाडू रायका ,श्री रोहन धुरी,श्री हितेन नाईक , श्री प्रथमेश गावडे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे केली होती .महाराष्ट्र राज्य मानद पशु कल्याण अधिकारी श्री सचिन झुंझारराव यांनी या प्रकरणी पूर्ण सहकार्य केले.

