विज ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करु नये..
▪️ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०६: तालुक्यासह जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अवाजवी बिले आली आहेत. याचाच फायदा घेत अनेकांचा वीज पुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. विना नोटीस वीजपुरवठा खंडित करू नये व अवाजवी आलेली बिले कमी करावीत अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर विनंती पत्राची प्रत मा.अधिक्षक अभियंता, कुडाळ, मा.कार्यकारी अभियंता, कणकवली, मा.तहसिदार, वैभववाडी व मा. उपकार्यकारी अभियंता, वैभववाडी यांना पाठविल्या आहेत. कोरोनाच्या काळात मा.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिटच्या आतील बिले माफ करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेक गोरगरीब वीज ग्राहकांनी वीज देयके भरली नव्हती. वीज देयके माफ तर सोडाच उलट त्यावर व्याज आकारून गोरगरिबांना बिले देऊन वीजबिल वसुली चालू केली आहे. विज बिलाची रक्कम लहान असो अगर मोठी असो तात्काळ भरणा करण्याचा तगादा विज मंडळाकडून केला जात आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांचे धंदे बंद पडले. काही व्यावसायिकांचे दिवाळे निघाले. सरकारकडून कोणतीच मदतही मिळाली नाही. पण सरकारच्या आधिपत्याखाली असणारी वीज कंपनी मात्र जनतेला वाढीव बिल देऊन वीज ग्राहकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत. तात्काळ वीज कनेक्शन खंडित करून व्यावसायाचे सुद्धा नुकसान करीत आहेत. वीज ग्राहकांना आलेली अवाजवी बिले कमी करून द्यावी, गोरगरिबांना बिलाचे हप्ते करून द्यावेत, नोटीस न देता वीज कनेक्शन खंडित करू नये अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने केली आहे. कायद्याप्रमाणे ग्राहकांना जे हक्क आहेत ते वीज ग्राहकांना मिळावेत. अनधिकृतपणे वीज कनेक्शन खंडित केल्यास होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. वीज वितरण कायदा २००३ कलम ५६ नुसार पंधरा दिवसांची नोटीस दिल्याशिवाय पुरवठा कापला जाऊ शकत नाही. जर नोटीस न देता खंडित केल्यास कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कलम २१७, २०१८ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो असा ग्राहकास अधिकार आहे. आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने दिलेल्या विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती संस्थेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस. एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_