ड्रेस कोडची सकारात्मक अंमलबजावणी करावी; ग्राहक पंचायतची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०१: सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचारी, सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोषाखा संदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ८ डिसेंबर,२०२० रोजी जारी केल्या आहेत. या ड्रेस कोडची सकारात्मक अंमलबजावणी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये व्हावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावर होतो. या सर्व बाबी विचारात घेता मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२०/प्र.क्र.७१/१८ (र.वका.) दिनांक ८ डिसेंबर,२०२० नुसार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने-
१) गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स, टी-शर्ट चा वापर कार्यालयांमध्ये करू नये.
२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.
३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयांमध्ये शक्यतो चपला, सॅंन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॕन्डल यांचा वापर करावा.
४) कार्यालयांमध्ये स्लिपरचा वापर करू नये.
५) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/ चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह करावा पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॕन्ट असा पेहराव करावा.
६) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालये येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबतची कल्पना देऊन ड्रेस कोडची सकारात्मकपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस.एन.पाटील, जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे व जिल्हा कोषाध्यक्ष श्री.संदेश तुळसणकर यांनी मेलव्दारे केली आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_