सावर्डे विद्यालयाच्या ‘साक्षी जड्याळ’ची राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०४: महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने फुलगाव जिल्हा पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची गुणी खेळाडू साक्षी संजय जड्याळ हिने १८ वर्षाखालील मुलींच्या गटात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत साक्षी जड्याळने उत्कृष्ट कामगिरी करीत चार किलोमीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे तिची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने निवड करण्यात आलेली असून २१ व २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पंजाब मधील चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी होण्याची तिला सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. साक्षी जड्याळ होतकरू, कष्टाळू व नम्र खेळाडू असून विद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे काम तिने आपल्या कामगिरीने केले आहे. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. उदयराज कळंबे, श्री. अमृत कडगावे व रोहित गमरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यतत्पर आमदार शेखर निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापिका सौ.मुग्धा पंडित, पर्यवेक्षक श्री. उद्धव तोडकर, ज्युनिअर विभागाचे प्रमुख श्री. विजय चव्हाण, एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख श्री. सलीम मोडक, ज्येष्ठ शिक्षक श्री. विजय काटे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_