शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डे विद्यालयाचा सामाजिक उपक्रम..
▪️होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी सह्याद्री सदैव; सौ. पूजा निकम
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१२: स्व. गोविंदराव निकम साहेब यांनी सह्याद्रीची स्थापना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत करून वंचित, सामान्य, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची दारे खुली केलेली आहेत. स्व. गोविंदरावजी निकम यांच्या उज्वल दृष्टिकोनाची जोपासना सध्याचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शेखर निकम करत आहेत. कोकणातील विद्यार्थी शिकला पाहिजे त्याचे उज्वल भविष्य निर्माण झाले पाहिजे या हेतूने सह्याद्री नेहमी निराधार व होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करत असते अजूनही असे काही विद्यार्थी आपल्या जवळपास असतील तर त्यांनी नक्कीच माझ्याशी वैयक्तिक संपर्क करावा असे आवाहन चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजाताई निकम यांनी केले आहे. कोकणातील विद्यार्थी प्रगत होऊन आजच्या आधुनिक युगात टिकला पाहिजे यासाठी सह्याद्री सदैव पाठीशी असेल अशी ग्वाही याप्रसंगी सौ. पूजाताई निकम यांनी दिली.
सह्याद्रीचे मार्गदर्शक,महाराष्ट्राचे जाणते नेते श्री. शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमासह अनाथ व निराधार विद्यार्थी दत्तक योजना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजाताई निकम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अन्वर मोडक, उपमुख्याध्यापिका सौ. मुग्धा पंडित, पर्यवेक्षक श्री. उद्धव तोडकर, कु. मुक्ता निकम, पालक व शिक्षक उपस्थित होते. रुपेश राजेंद्र होडे १० वी, शुभम सिताराम माने 8वी, अरमान निसार मुल्लाजी ७ वी, नियाज निसार मुल्लाजी ८ वी व प्रज्योत राजेंद्र होडे ७ वी या पाच विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शालेय गणवेश,वह्या व पुस्तके यांचे वाटप करण्यात आलेले असून या विद्यार्थ्यांचा बारावी अखेरपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च सौ. पूजाताई निकम करणार आहेत. शिक्षणासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हे सर्व विद्यार्थी व पालक भारावून गेले होते. प्राथमिक स्वरूपात या विद्यार्थ्यांना विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने दत्तक घेतलेले असून यापुढेही अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यालय व संस्था सहकार्य करणार आहे मात्र विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करावा अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अन्वर मोडक यांनी दिली.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_