सावर्डे विद्यालयात पोलीस-विद्यार्थी संवाद..
▪️मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करा; भारत धुमाळ
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०४: कोविड-१९ पूर्वी मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास कर अशी पालकांची सूचना होती मात्र कोविड-१९ मुळे मोबाईल संवादाचे अत्यंत महत्त्वाचे साधन झाल्यामुळे मोबाईल घेऊन अभ्यास कर अशी सूचना पालकांच्या कडून येते. जागतिक स्थितंतरामुळे मोबाईल आज संवादाचे महत्वाचे साधन आहे मात्र त्याचा वापर योग्य तऱ्हेने केला तरच सायबर क्राईमपासून स्वतःला दूर ठेवता येईल असे प्रतिपादन सावर्डे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. भरत धुमाळ यांनी केले.
समाज व पोलीस यांच्यामध्ये सलोखा प्रस्थापित होण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पोलीसकाका व पोलीसदीदी या उपक्रमांतर्गत सावर्डे पोलिस स्टेशनच्या वतीने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस- विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सावर्डे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक धनश्री करंजकर व श्री. भरत धुमाळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री.प्रशांत पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अन्वर मोडक, पर्यवेक्षक श्री.उद्धव तोडकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.मोबाईल वरती असणाऱ्या विविध जाहिराती,लिंक,खेळ व संदेशांच्या आमिषाला बळी पडून आपण क्लिक करतो मात्र पुढे त्यामध्ये गुंतत जाऊन फसले कसे जातो याची माहिती दिली. योग्य मैत्री, आहार, व्यसनापासून दूर राहणे व उज्वल भविष्याची स्वप्न पाहणे हीच विद्यार्थी दशेतील जडणघडणीची महत्वपूर्ण बाब कशी आहे याचे सविस्तर विवेचन धनश्री करंजकर यांनी केले.श्री. भरत धुमाळ यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अडीअडचणी बाबत पोलिसांशी संपर्क साधण्याचे व मोबाईलच्या गैरवापर होणारे अनिष्ट परिणामाची माहिती पालकांच्या पर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. श्री. दिलीप डंबे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_