जिल्हावासियांनी कोणतीही भिती न बाळगता लस घ्यावी; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०४: जिल्हावासियांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी , जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.

प्रत्येकाने कोविडची लस घ्यावी, आपल्या कुटुंबियांनाही लस द्यावी. कोणीही मागे राहू नये, जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के लसीकरण झाले आहे. तरी उर्वरीत लाभार्थींनीही स्वतः पुढाकार घेऊन लस घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केले.

सर्वांनी लवकरात लवकर लस घेऊन सहकार्य करावे, सर्व सहकारी व नातेवाईक यांना याविषयी अश्वस्त करावे व लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!