प्रधानमंत्री स्वयं रोजगार योजना व मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेचे उद्दिष्ट व पिक कर्ज वितरण वाढीसाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.31: जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री स्वयं रोजगार योजना व मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेचे उद्दीष्ट बँकानी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. शेतकरी केंद्रबिंदू मानून बँकानी पीक कर्ज वितरण वाढीसाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या (DLCC) बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक (LDM) पी.के. परमनिक, आरसेटीचे संचालक आर. परब, विविध बँकेचे व्यवस्थापक, महामंडळांचे व्यवस्थापक, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी पुढे म्हणाल्या, चालु वर्षापासून पशुसंवर्धन, मासेमारी, कुक्कुटपालन या व्यवसायासाठी पीक कर्ज सुविधेतून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकांनी या व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन द्यावे. आरसेटीच्या माध्यमातून अत्यावश्यक असणारे व रोजगार मिळवून देणारे विविध व्यवसायांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात यावे. आरसेटी व जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) यांच्याशी संलग्न होवून प्रशिक्षणाचे आयोजन करावे. असे सांगून, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी मा. निवडणूक आयोगाने ग्रामपंचयात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयकृत अथवा शेड्युल्ड बँकमध्ये चालू किंवा बचत खाते उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची खाती उघडताना उमेदवारांना बँकांनी सहकार्य करावे, असे निर्देश दिले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, पी.एम. किसान योजना याबाबतचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. बँकानी पीक कर्ज वाटप अहवाल संबंधित वरिष्ठ कार्यालयांना वेळेत पाठवावा. रब्बी पीक कर्ज वाटप उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.
जिल्ह्यामध्ये बचत गटांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी M.S.R.L.M.अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम आला आहे ही बाब जिल्ह्यासाठी अभिनंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी नाबार्ड जिल्हा बँकेच्या संभाव्यता मुक्त ऋण योजना या पुस्तकाचे प्रकाशनही जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

