रामजन्मभूमी निधी समर्पण अभियानाला चिपळुणात भरघोस प्रतिसाद..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०३: श्रीराम जन्मभूमी चे स्वप्न पूर्ण होताना आपण पहात आहोत. त्या अनुषगाने देश विदेशात श्रीरामजन्म भूमी त्रिर्थक्षेत्र न्यासा तर्फे १५ जानेवारी पासून निधी समर्पण अभियान चालू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिपळूण शहरात वस्तीवस्तीत हे अभियान चालू आहे.
चिपळूण परिसरातील प्रत्येक घरा पर्यत पोहचायचा प्रयत्न रामभक्त करीत आहेत.ह्या अभियानाला चिपळूणकरांनी भरघोस प्रतिसाद देत आहेत. रामभक्तांचे घराघरात स्वागत होत आहे.त्यात गरीब श्रीमंत असा भेद नाही आहे. रामभक्त जनतेच्या स्वागतामुळे भारावून गेले आहेत. घरातील आगत स्वागत लक्षणीय आहे.ह्या आगत स्वागताचा अव्हेर रामभक्तांना करता येत नाही. त्यामुळे रोज आमची घरे कमी होत आहेत अशी प्रेमळ तक्रार रामभक्तांची आहे पण जनतेने राममंदिर हे राष्ट्रमंदिर आहे हे स्वीकारल्यामुळे रामभक्ताचा उत्साह अजून वाढत आहे.
चिपळूण शहरामध्ये रोज संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यत जवळपास २०० च्यावर रामभक्त फिरत आहेत.त्यात तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.अंदाजे अत्ता पर्यत नऊ हजार घरांमध्ये संपर्क झाला आहे.त्याद्वारे समर्पण निधी लाखोंनी जमा झाली आहे.
ह्या निधी समर्पण अभियानाला जनतेने दिलेल्या प्रतिसादा बद्दल बोलताना निधी समर्पण जिल्हा प्रमुख उदय चितळे,शहर प्रमुख किशोर कडवेकर आणि सहप्रमुख गुरुनाथ भिडे यांनी आभार मानले आहेत.आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की हे रामाचे काम काम आहे त्यामुळे त्याला प्रतिसाद नक्की मिळेल असे वाटल होत पण अत्ता मिळणार प्रतिसाद हा स्वप्नवत आहे.रामभक्तांचे स्वागत आणी रामभक्ताचा सहभाग ह्यांनी आम्ही भारावून गेलो आहोत.खरच राम हे सगळं करवून घेतो अशी भावना त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली.
अजून १५ फेब्रुवारी पर्यत हे अभियान राबवले जाणार आहे.कोणीही रामभक्त ह्या राष्ट्र कार्यापासून वंचीत राहू नये म्हणून घराघरात पोहचायच्या प्रयत्न केला जाणार आहे.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

