🛑 सिलिंडरच्या स्फोटात घर बेचिराख ; साटेली – भेडशी येथील घटना
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०९:- साटेली – भेडशीत मंगळवार दि-८ एप्रिल रोजी सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झाल्याची घटना घडली आहे. अंकिता अर्जुन नाईक यांचे हे घर होते, ही घटना साटेली – भेडशीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस घडली,यामध्ये रोख रकमे सह घरातील सर्व समान आगीच्या भक्षस्थानी पडले.
अंकिता नाईक यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यातच घराला अचानक आग लागून नुकसान झाल्यामुळे नाईक कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. साटेली-भेडशी बाजारपेठेत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्फोटाप्रमाणे मोठा आवाज झाला. त्याचक्षणी परमे रोडच्या दिशेने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूला असलेल्या एका घरातून धुरासह आगीचे लोळ येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. कसई दोडामार्ग न. प. चा अग्निशमन बंबही तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. नगराध्यक्ष चेतन चव्हाणही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आगीची तीव्रता इतकी होती, की घर पूर्णपणे बेचिराख झाले. साटेली-भेडशी तलाठी श्रीमती परब, मंडळ अधिकारी मंडळ राजन गवस, साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार घरात देवासमोर दिवा पेटत होता. त्यातच सिलिंडर लिक झाल्याने ही दुर्घटना घडली.
घर बेचिराख झालेले पाहून अंकिता अर्जुन नाईक यांना अश्रू अनावर होत होते. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले असून या दुःखातून सावरत असतानाच ही दुर्घटना घडली. मुलगा व शेजारील महिला त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. नवीन घर बांधण्यासाठी ठेवलेले रोख रुपये पस्तीस हजार रुपयेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील किमती वस्तू जळून खाक झाल्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

