आपत्कालीनकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

*त्या बिहारी मारहाणीतील खरी वस्तुस्थिती वेगळीच..ठेकेदाराला उसकवल्याने घडला प्रकार*

*त्या बिहारी मारहाणीतील खरी वस्तुस्थिती वेगळीच..ठेकेदाराला उसकवल्याने घडला प्रकार*

*त्या बिहारी सेंट्रींग कामगाराने शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार*

सावंतवाडी –
तू खोदाई करुन घे मी तुझे काम करुन देतो असे सांगून वारंवार पैशाची उचल करुन नंतर दुसऱ्याच ठेकेदाराकडे काम केले याबाबत जाब विचारल्यावर तू काय माझ्याशी करार केलास तूझ्यात एवढीच हिम्मत असेल तर बावळाटला ये असे हिंदी मध्ये सांगून दोन वेळा फोन करुन ठेकेदार रोशन डेगवेकर याला उसकवले अखेर त्या ठिकाणी डेगवेकर त्या ठिकाणी गेले असता त्यांच्या मध्ये बाचाबाची झाली यात बिहार येथील बुलेट मेहंतो जखमी झाला याबाबत त्याचा भाऊ लवकुश मेहंतो यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ठेकेदार रोशन डेगवेकर याचे एका ठिकाणी काम सुरू होते,त्या ठिकाणी खोदाई करून ठेवली होती बुलेट मेहंतो यांनी मी सेंट्रींग काम करुन देतो असे सांगून वारंवार पैशाची उचल केली मात्र रोशन डेगवेकर यांच्या कडे कामाला न जाता दुसऱ्याच ठेकेराकडे कामाला गेला याचा जाब भ्रमणध्वनीवरून बुलेट मेहंतो याला रोशन डेगवेकर यांनी विचारला असता अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन डेगवेकर याला मेहंतो यांनी उसकवले अखेर रोशन डेगवेकर बावळाठ येथे जाब विचारण्यासाठी गेला असता बाचाबाची होऊन मेहंता जखमी झाला.
याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ लवकुश मेहंतो यांनी सावंतवाडी पोलिसांत देऊन ठेकेदार रोशन डेगवेकर त्याच्या साथिदारांनी आपल्या भावाला मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे,मात्र बुलेट मेहंतो याला शरीरावार कुठेही जखम नसून वैद्यकीय सुत्रांच्या दाखल्या नुसार उजव्या डोळ्याखालचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
याबाबत रोशन डेगवेकर यांनी परस्पर विरोधी तक्रार दिली असून बुलेट मेहंतो यांनी आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अधीक तपास आंबोली दुरक्षेत्राचे पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!