🛑मळगाव येथील रुपाली गुडेकर यांचा खानोलकर वाचनालयाच्यावतीने सत्कार
*🛑मळगाव येथील रुपाली गुडेकर यांचा खानोलकर वाचनालयाच्यावतीने सत्कार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगावतर्फे स्व. यशवंती धोंडू पटेकर स्मृती प्रित्यर्थ श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर – पटेकर पुरस्कृत ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात जागतिक माहिला दिनाच्या निमित्ताने ‘उमेद’च्या माध्यमातून बचत गटामार्फत महिला सक्षमीकरणाचे कार्य करणाऱ्या अनमोल ग्रामसंघाच्या व्यवस्थापिका मळगावच्या स्नुषा रुपाली गोपाळ गुडेकर यांना मळगावातील कतृत्ववान महिला म्हणून शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देवून प्रमुख अतिथी मिनल बाबली तेली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर, प्रायोजक श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर – पटेकर तसेच प्रमुख अतिथी मळगावच्या माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मिनल तेली, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष महेश पंतवालावलकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, संचालक पृथ्वीराज बांदेकर, माजी अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, कर्मचारी वर्ग तसेच महिला वर्ग आदी उपस्थित होते. सत्कारमुर्ती रुपाली गुडेकर यांनी वाचनालयाने केलेला सत्कार हा घरचा सत्कार असून तो आपल्यासाठी खास आहे. आपण हा सत्कार कधीही विसरणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिनल तेली यांनी वाचनालयाला १ हजारची रोख देणगी वाचनालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर यांच्याजवळ सुपूर्द केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक गुरुनाथ नार्वेकर तर सुत्रसंचालन व आभार पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

