🛑गोगटे-वाळके महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न
*🛑गोगटे-वाळके महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १२:-* महाविद्यालयीन मुलींनी आपले ध्येय ठरवावे. त्यासाठी आवश्यक असणारे वाचन करावे, महाविद्यालयीन तीन वर्षांच्या काळात आपल्यातील कलागुणांचा विकास व्हावा यादृष्टीने प्रयत्न करावेत.आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असल्या तरी त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात.स्त्रियांनी स्वतःसाठी जगणे ही एक काळाची गरज असल्याचे सांगत असताना त्यांनी अनेक यशस्वी स्त्रियांची उदाहरणे दिली. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच आपल्यावर होणारा अन्याय,आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. महिलांनी शिक्षण, आपले मानसिक व शारीरिक आरोग्य, आपले ध्येय आपली सुरक्षितता याबाबत जागरूक असावे यासाठी आवश्यक असणारे योग्य ते वाचन करावे आणि आपली दिशा ठरवावी असे प्रतिपादन संत सोहीरोबानाथ शासकीय महाविद्यालय पेडणे येथील मराठी विभागाच्या प्रा.डॉ. भक्ती महाजन यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात ८ मार्च रोजी महिला विकास कक्ष विभागांतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्री. डी.बी.वारंग उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री एस.आर.सावंत तसेच सहसचिव श्री पणशीकर सर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर होते. याप्रसंगी बोलताना ‘महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सखोल वाचन करुन अधिक ज्ञान प्राप्त करावे, आपल्या ध्येयाची निश्चिती करावी, विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी अथक परिश्रम करावेत आणि आपले यशस्वी जीवन घडवावे’ अशा शब्दात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष विभागप्रमुख प्रा.रश्मी काजरेकर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. हर्षवर्धिनी जाधव यांनी केले तर आभार महिला विकास कक्षाचे सदस्य आणि महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अनिल शिर्के यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

