करियरकोकणरत्नागिरीसामाजिक

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे शाश्वत पर्यटन परिषद..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रत्नागिरी

🎴रत्नागिरी,दि.२५: जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २७ जानेवारीला सकाळी ९ ते ४ या वेळेत अंबर मंगल कार्यालय येथे दिवसभर चर्चासत्र, व्याख्याने, परिसंवाद होणार असल्याची माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

परिषदेला पर्यटनमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, पर्यटन महामंडळाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, बांधकाम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यटन विषय  तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सदर पर्यटन परिषद ही सशुल्क, मार्यदित प्रवेश (प्रथम येणाऱ्याला प्राधान्य) अश्या स्वरूपाची असणार आहे.

जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला, विकासाला शाश्वत अशी नवी दिशा देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करतोय. पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास व नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या हेतूने तिसरी पर्यटन परिषद आयोजित केली आहे.

या परिषदेमध्ये महत्वाचा पर्यटन पैलू हाताळण्यात येणार आहे. हेरिटेज टुरिझम, दुसर्‍या सत्रामध्ये शाश्‍वत पर्यटन क्षमता व आव्हाने यावर चर्चासत्र होईल. यामध्ये हॉटेल्स असोसिएशन, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, सामाजिक व पर्यटन संस्था, लोकप्रतिनिधी, पर्यटन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, लवकरच होणारी प्रवासी विमान वाहतूक यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे, यातून जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि तरुणांना रोजगारही मिळू शकतो, याकरिता परिषद आयोजित केली आहे. यात जास्तीत जास्त शेतकरी, आंबा बागायतदार, तरुण बेरोजगार, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी, समुद्रकिनारी जमिन असणारे शेतकरी, पडिक जमिनींचे मालक, पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, सदर पर्यटन परिषद यशस्वी करण्या करता आपण विविध सेवा, वस्तू स्टोल, शुभेच्छा बॅनर, देणगी, अश्या स्वरूपात हार्दिक मदत ही अपेक्षित आहे आणि आपण अशी मदत करावी असे आवाहन श्री. भाटलेकर यांनी केले.

संपर्क 913038366,
🔵 रजिस्ट्रेशन त्याच दिवशी on the spot च राहणार आहे,
🔵 शुभेच्छा बॅनर, देणगी, स्टॉल, या करता संपर्क सुहास ठाकुरदेसाई 9822290859, या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!