राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रवी जाधव यांचे उपोषण अखेर मागे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड

🎴सावंतवाडी,दि.२६: पालिकेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारुन द्यावा, यासाठी गेले सात दिवस रवी जाधव यांनी पालिकेसमोर उपोषण छेडले होते. सोमवारी रात्री नऊ वाजता माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी शिष्टाई केल्यावर श्री. जाधव यांनी आपले उपोषण सोडले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन योग्य न्याय देण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिल्याने जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी योग्य भूमिका घेत श्री. जाधव कुटुंबियांच्या हिताच्या दृष्टीने आ. दीपक केसरकर यांना मंत्रीस्तरावर याबाबतचा प्रश्न सोडवण्याची विनंती केल्याने अखेर श्री. जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यावेळी साक्षी वंजारी, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, तानाजी वाडकर, संजय पेडणेकर, उमाकांत वारंग, मयू पटेकर, सागर नाणोसकर, अभय मालवणकर आदी उपस्थित होते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!