चौकुळ मधील रस्त्यांची कामे सुरू न केल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन -सरपंच गुलाबराव गावडे.
*🛑 चौकुळ मधील रस्त्यांची कामे सुरू न केल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन -सरपंच गुलाबराव गावडे.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-*मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजुर चौकुळ- मळववाडी-बेरडकी चुरणीचीमुस रस्ता व चौकुळ चि. बेरडकी जांभरे रस्ता करणे काम सुरु न झाल्यास कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांना घेउन ठिया आंदोलन करणार असल्याचे निवेदन चौकुळ ग्रामपंचायत तर्फे संबंधित विभागाला देण्यात आले.
चौकुळ- मळववाडी-बेरडकी चुरणीचीमुस रस्ता व चौकुळ चि. बेरडकी जांभरे रस्ता हे दोन रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर असुन सदयस्थितीत दोन्ही कामे पाच वर्षे होउनही अर्धवट आहेत तर काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ही दोन्ही रस्ता कामे अर्धवट स्थितीत असल्यामुळे या दोन्ही वाड्यावरील ग्रामस्थांना वाहतुकीचे कुठलेही साधन उपलब्ध नाही तसेच अतिशय जंगलमय भागात या वाड्या असल्याने वन्य प्राण्यांचे हल्ले तसेच इतर आजारी रुग्णांना, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या बाबत ग्रामपंचायत कडुन वेळोवेळी पाठपुरावा करुनही संबधीत ठेकेदार व संबंधित बांधकाम कार्यालयाकडून कार्यालयाकडुन रस्त्याचे काम सुरु करण्याबाबत कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांचा रोष ग्रामपंचायत प्रशासनावर येत आहे.
हे दोन्ही ठिकाणचेरस्ता काम संबधीत ठेकेदाराने शनिवार दि. ११जानेवारी२०२५ पर्यंत प्रत्यक्ष सुरू न केल्यास सोमवार दि.१३जानेवारी पासुन कोणतीही सुचना न देता या दोन्ही वाडीवरील ग्रामस्थांना व त्यांच्या कुटुंबीयाना घेउन कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल. व याची सर्व जबाबदारी कार्यकारी अभियंता कार्यालयाची राहील. यानंतरही आपल्याकडुन प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही तर दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा चौको ग्रामपंचायत व सरपंच गुलाबराव गावडे यांनी दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

