क्रीडाराजकीयवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात ‘कोकीसरे’च्या दोन खेळाडूंची निवड..

▪️वैभववाडी भाजपच्या वतीने युवा खेळाडू ओंंकार नेवरेकर, वृतीक बेळेकर यांचा सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२४: तालुक्यातील कोकीसरे गावच्या दोघा युवा खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. ओंंकार प्रकाश नेवरेकर व वृतीक प्रकाश बेळेकर अशी या खेळाडूंची नावे आहेत. निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचा वैभववाडी भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ओडिशा येथील भुवनेश्वर येथे ९ मार्च ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत केलेल्या कामगिरीचा विचार करून या दोघांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाचा होत आहे. वैभववाडी भाजपने या दोघा खेळाडूंचा सत्कार केला आहे.

तालुका अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, माजी सभापती मंगेश गुरव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, तालुका अध्यक्ष किशोर दळवी, ग्रा.पंं. सदस्य प्रदीप नारकर, प्रकाश पाटील, अनंत फोंडके उपस्थित होते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!