🛑 कॉसमॉस सहकारी बँकेच्या संचालक मंडळात अनुश्री माळगावकर यांची बिनविरोध निवड..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६: डिंगणे (ता. सावंतवाडी) येथील अनुश्री माळगावकर (पूर्वाश्रमीच्या छाया उत्तम सावंत) यांची कॉसमॉस सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळात बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने डिंगणे दशक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
बहुराज्यांत विस्तार असलेल्या कॉसमॉस बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडल्याचे बँकेने जाहीर केले आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०२४ अखेर संपुष्टात येत आहे.
‘बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा २००२’ मधील तरतुदीनुसार सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मान्यतेनुसार यंदाची निवडणूक झाल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राऊत यांनी जाहीर केले. संचालक मंडळातील एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे श्री राऊत यांनी सांगितले. विद्यमान संचालक मंडळातील ७ जणांचा नवीन संचालकांमध्ये समावेश असून, सहा लोकांना नव्याने संधी मिळाली आहे. यांच्या व्यतिरिक्त २५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत माघार घेतल्याने, मतदान घेण्याची गरज भासली नाही. निवडून आलेल्या बँकेच्या संचालकांमध्ये, रसिका गुप्ता, सुरेखा जोशी, प्रवीणकुमार गांधी, अजित गिजरे, सुब्रमणियम संथानम, घनश्यामभाई अमिन, अॅड. प्रल्हाद कोकरे, सचिन आपटे, सीए यशवंत कासार, अरविंद तावरे, बाळासाहेब साठे, अनुश्री माळगावकर आणि रेखा पोकळे यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाचा कार्यकाळ २०२४-२५ ते २०२९- ३० असा पाच वर्षांसाठी असणार आहे. अनुश्री मळगावकर या मुळ डिंगणे येथील आहे. त्यांच्या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

